'ठुकरा के मेरा प्यार...', जिममध्ये गाणे वाजताच तरुण पेटला, व्यायाम पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:23 IST2025-10-29T15:22:24+5:302025-10-29T15:23:16+5:30
Viral Gym: व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

'ठुकरा के मेरा प्यार...', जिममध्ये गाणे वाजताच तरुण पेटला, व्यायाम पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Viral Gym Video:सोशल मीडियाच्या दुनियेत दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या जिममधील एका नव्या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओत एका अतिशय बारीक/हाडकुळा तरुण जिममध्ये अतिशय आक्रमकतेने व्यायाम करताना दिसतोय. विशेष म्हणजे, जिममध्ये एक खास गाणे वाजल्यानंतर, त्या तरुणाच्या अंगात वेगळीच उर्जा संचारते.
गाणे वाजले अन् तरुण पेटला
व्हिडिओमध्ये दिसते की, जिममध्ये 'शादी में जरूर आना' या चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘ठुकरा के मेरा प्यार, मेरा इंतकाम देखेगी’ वाजताच, या बारीक तरुणाच्या अंगात वेगळीच उर्जा संचारते. तो इतक्या जोशात व्यायम करायला लागतो की, जिममध्ये उपस्थित इतर तरुण थक्क होतात. त्याच्या चेहऱ्यावरचा राग, हालचाली आणि ‘रिव्हेंज मूड’मुळे नेटकरी हसता हसता लोटपोट झाले आहेत.
व्हिडिओवर मजेशीर कमेंट
ये ब्रेकअप का दर्द है रमेश बाबू 🥺
— Aditi Menon (@Aditi_Menon_123) October 28, 2025
इसे वही समझेगा जिसने प्यार किया है 🙁😎 pic.twitter.com/Fzeioy2j2Q
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटले, “भाऊ, इतका राग जिमवर का काढतोस? जरा आराम कर, नाहीतर इंतकामच्या चक्करमध्ये इंतकाल होईल!” आणखी एकाने कमेंट केले, “भाईच्या डेडिकेशनला सलाम! इतकी मेहनत तर प्रो बॉडीबिल्डर्सही करत नाहीत.” तर एकाने हसत लिहिले, “हे पाहून माझे जिमचे पहिले दिवस आठवले. तेव्हा मीही असा सुपरहिरो बनायचा प्रयत्न करत होतो!”
लाखो व्ह्यूज, हजारो लाईक्स
हा भन्नाट व्हिडिओ @Aditi_Menon_123 या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत.