कौतुकास्पद! कॅन्सरग्रस्त वडिलांसाठी मुलाने जे केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 02:54 PM2021-09-24T14:54:25+5:302021-09-24T15:04:33+5:30

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही बाप-लेकाच्या नात्यापेक्षा सुंदर नातं आणखी कोणतंच नाही असं नक्की म्हणाल. 

son shaves head to support father battling cancer video goes viral on social media | कौतुकास्पद! कॅन्सरग्रस्त वडिलांसाठी मुलाने जे केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील; Video व्हायरल

कौतुकास्पद! कॅन्सरग्रस्त वडिलांसाठी मुलाने जे केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील; Video व्हायरल

Next

नवी दिल्ली - माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार हे सतत येत असतात. अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही वेळा या संकटाचा सामना करताना काही जण खचतात, हार मानतात तर काही अडचणींवर जिद्दीने मात करतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी येतच असतात. मात्र, हे महत्त्वाचं ठरतं, की यातून आपण बाहेर पडत कशाप्रकारे स्वतःचं आयुष्य जगतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही बाप-लेकाच्या नात्यापेक्षा सुंदर नातं आणखी कोणतंच नाही असं नक्की म्हणाल. 

आपल्या मुलांना अडचणीत किंवा दुःखात बघताच प्रत्येक बाप हाच विचार करतो की यांना यातून बाहेर काढून याचं दुःख कसं कमी करता येईल. प्रत्येक वडील वाईट काळात आपल्या मुलाची साथ देत त्याला आधार देण्याचं काम करत असतात. मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील मुलगा वडिलांसाठी जे काही करतो ते पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. मुलगा कॅन्सरचा सामना करणाऱ्या आपल्या वडिलांचा आधार बनला आहे. सध्या त्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील वडिलांना कॅन्सर होता, मात्र मुलानं आपल्या वडिलांसाठी जे केलं ते भावूक करणारं होतं.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ GoodNewsCorrespondent या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे, कोणीही एकटं लढत नाही. या मुलानं स्वतः टक्कल करत आपल्या कर्करोगग्रस्त वडिलांना आश्चर्याचा धक्का दिला. 'इतके चांगले वडील होण्यासाठी धन्यवाद... जसं म्हटलं जातं तसंच, बाप तसा मुलगा. आता आपण सारखेच आहोत...2 सुंदर लोक' असं मुलाने म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की मुलगा आधी आपल्या वडिलांचे केस कापतो. याच दरम्यान अचानक तो स्वतःचेही केस कापू लागतो. हे पाहून आधी त्याचे वडील हैराण होतात. मात्र, नंतर हे दोघंही भावूक होतात आणि रडू लागतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: son shaves head to support father battling cancer video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app