शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

विनातिकीट वंदे भारत ट्रेनमध्ये चढले अन् फसले; दरवाजे बंद होण्याची वेळ झाली, ५ हजारांचा दंड…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:46 IST

Vande Bharat Train Social Viral Video: वंदे भारत ट्रेनच्या स्वयंचलित दरवाज्यांमुळे देशभरात अनेक किस्से घडताना पाहायला मिळतात. यामुळे अनेक प्रवाशांचे मोठे नुकसानही होते.

Vande Bharat Train Social Viral Video: भारतीय रेल्वेची वंदे भारत ट्रेन दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. गेल्या सुमारे ६ वर्षांच्या कालावधी तब्बल ७ कोटींहून अधिक प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणारी वंदे भारत ही केवळ एक ट्रेन नाही तर ती आत्मनिर्भर भारताचे प्रतीक बनली. परंतु, वंदे भारत ट्रेनबाबत अनेक मजेशीर घटना घडत असतात. अत्याधुनिक ट्रेनबाबत लोकांना उत्सुकता असली तरी त्यातील अनेक गोष्टींमुळे प्रवाशांना मनस्तापही सहन करावा लागतो.

मुंबईकरांना मोठी गुड न्यूज! ‘ही’ वंदे भारत ट्रेन २० कोचसह धावणार, प्रवाशांचा प्रतिसाद वाढला

आताच्या घडीला वंदे भारत ट्रेनच्या सुमारे १६४ सेवा देशभरात प्रवाशांना सेवा देत आहेत. अनेकदा वंदे भारत ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे बंद झाल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. काही घटनांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद झाल्यामुळे काही लोक वंदे भारत ट्रेनमध्ये अडकून पडले. त्यांना तिकिटाचे पैसेही भरावे लागले आणि अनेक तासांच्या प्रवासानंतर सुटका झाली. तर अनेक घटनांमध्ये प्रवाशांना स्टेशनवर पोहोचायला उशीर झाल्यामुळे तसेच स्वयंचलित दरवाजांमुळे ट्रेन डोळ्यासमोरून गेल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर याबाबतचे अनेक व्हिडिओ, पोस्ट व्हायरलही होत असतात.

स्वयंचलित दरवाज्यांपासून वाढता धोका अन् प्रवाशांना इशारा

वंदे भारत ट्रेनचे दरवाजे स्वयंचलित असतात. स्टेशनवर थांबल्यानंतर काही मिनिटांतच ते आपोआप बंद होतात. म्हणून, जर कोणी फक्त प्रवाशाला सोडण्यासाठी किंवा नेण्यासाठी ट्रेनमध्ये चढले तर तो अडकण्याचा धोका असतो. रेल्वे नियमांनुसार, तिकिटाशिवाय ट्रेनमध्ये चढणे हा दंडनीय गुन्हा आहे. वंदे भारत सारख्या मर्यादित थांबे असलेल्या ट्रेनमध्ये, ही चूक प्रवाशांना महागात पडू शकते. कारण जर दरवाजे बंद झाले तर पुढचे स्टेशन बरेच दूर असू शकते. व्हायरल व्हिडिओने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आणि रेल्वे नियमांचे पालन करण्याचे महत्त्व शिकवल्याचे म्हटले जात आहे.

विनातिकीट वंदे भारत ट्रेनमध्ये चढले आणि फसले

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक विनातिकीट वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चढताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ बिहारमधील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये वैध तिकिटे नसतानाही ट्रेनमध्ये अनेक पुरुष आणि महिला चढल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, वंदे भारत ट्रेनच्या नियमांबद्दल चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एका रेल्वे कर्मचारी विनातिकीट चढलेल्या गावातील काही महिला आणि पुरुष प्रवाशांना ताबडतोब उतरण्यास सांगत असून, लगेचच उतरला नाही तर रेल्वेचे दरवाजे बंद केले जातील, असे सांगताना दिसत आहे. त्यातील एकाने त्या प्रवाशांना माहिती दिली की, वंदे भारत ट्रेनच्या विना तिकीट प्रवासावर ₹५,००० पर्यंत दंड आकारला जातो. ही माहिती कळताच, प्रवाशांना भीती वाटली आणि ते लगेचच लगबगीने वंदे भारत ट्रेनमधून खाली उतरल्याचे या व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Caught in Vande Bharat Without Ticket, Fined ₹5000!

Web Summary : Vande Bharat's popularity grows, but automated doors cause issues. Some boarded without tickets, facing ₹5000 fines. Viral video highlights risks and need to follow rules.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसTravel Tipsट्रॅव्हल टिप्सSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpassengerप्रवासीticketतिकिटTwitterट्विटर