'या' फोटोमध्ये लपलाय 7 फूटांचा अजगर; पाहा तुम्हाला दिसतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 04:31 PM2019-07-25T16:31:42+5:302019-07-25T16:32:44+5:30

काही दिवसांपासून इंटरनेटवर एक फोटो व्हायरल होत असून त्यात एका मोठ्या अजगराचा शोध घेतला जात आहे. खरंतर या फोटमध्ये एक 7 फूटांचा अजगर आहे. पण फोटोमध्ये त्याला शोधताना फार दमछाक होत आहे.

Social Viral Spot the snake family discovers 7ft python on verandah in Australia | 'या' फोटोमध्ये लपलाय 7 फूटांचा अजगर; पाहा तुम्हाला दिसतोय का?

'या' फोटोमध्ये लपलाय 7 फूटांचा अजगर; पाहा तुम्हाला दिसतोय का?

Next

आपण दररोज अनेक व्हायरल झालेल्या गोष्टी पाहतो. जे पाहून आपलं डोकं अगदी चक्रावून जातं. अनेकदा इंटरनेटवर दृष्टि भ्रम करणारे म्हणजेच, Optical Illusion असणारे फोटो व्हायरल होत असतात. काही लोकांना अशा फोटोंचा फार राग येतो, तर काही लोक अशा फोटोंमध्ये दडलेलं गुपित सोडवण्यासाठी अगदी वाट्टेल ते करायला तयार होत असतात. 

काही दिवसांपासून इंटरनेटवर एक फोटो व्हायरल होत असून त्यात एका मोठ्या अजगराचा शोध घेतला जात आहे. खरंतर या फोटमध्ये एक 7 फूटांचा अजगर आहे. पण फोटोमध्ये त्याला शोधताना फार दमछाक होत आहे. अनेक प्रयत्न करूनही अनेकांना तो दिसत नाहीये. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी लोकांना चांगलंच लक्ष केंद्रीत करावं लागत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर एका घराच्या बालकनीचा फोटो व्हायरल होत असून त्या फोटोमध्ये लोक अजगर शोधण्यासाठी धडपडत आहेत.

ऑस्ट्रेलियातील एक कुटुंब त्यांच्या घरी परतल्यानंतर त्यांना अजगर दिसला. त्यावेळी त्यांनी Sunshine Coast Snake Catchers या संस्थेशी संपर्क साधून मदत मागितली. या संस्थेने त्यांच्या फेसबुक पेजवरून बालकनीचा एक फोटो शेअर केला असून नेटकऱ्यांना विचारलं की, तुम्हाला कुठे अजगर दिसतोय का? 

घरात एवढा मोठा अजगर पाहून घाबरले लोक

क्वींसलँडमध्ये राहणारं हे कुटुंब बाहेर गेले होते. घरी परतल्यावर अजगर पाहून त्यांच्या तोंडचं पाणीच पळालं होतं. त्यांनी त्वरित साप पकडणाऱ्या लोकांना फोन लावला. त्यावेळी Sunshine Coast Snake Catchers या टिमने अजगर पकडला. या दरम्यान टिमने असा फोटो काढला की, त्यामध्ये सहजा सहजी अजगर अजिबात दिसत नाही. हा फोटो व्हायरल झाला.

 

तुम्हाला कुठे दिसतोय का साप? 

फोटो शेअर करताना सनशाइन स्नेक कॅचर्स यांनी लिहिलं की, 'अजगर शोधा, आम्ही बऱ्याच दिवसांपासून हा खेळ खेळला नाही. त्यामुळे पाहूयात तुम्ही शोधू शकता का? आणि जर तुम्ही सांगितलतं की, हा अजगर कोणत्या प्रजातिचा आहे, तर तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स देण्यात येतील.'

सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, एवढं डोकं फोडूनही नेटकऱ्यांना काही अजगर दिसलाच नाही. काहिंनी तर फोटोशॉपचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी अजगर दाखवून फोटो शेअर केले. 

अरे देवा इथे आहे साप!

सनशाइन स्नेक कॅचर्स यांनीच एक व्हिडीओ शेअर करून अजगर असलेली जागा दाखवली. डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, अजगराला पकडून सुरक्षित पद्धतीने जंगलामध्ये सोडून देण्यात आलं. 

Web Title: Social Viral Spot the snake family discovers 7ft python on verandah in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.