शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भर रस्त्यात नाचणं मॉडेलला पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 17:22 IST

इंदौरमधील एका गजबजलेल्या चौकामध्ये डान्स करणाऱ्या मध्य प्रदेशातील इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

इंदौरमधील एका गजबजलेल्या चौकामध्ये डान्स करणाऱ्या मध्य प्रदेशातीलइन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. श्रेया कालरा (Shreya Kalra) असे या मॉडेलचे नाव आहे. ही क्लिप व्हायरल होताच वाहतूक थांबवून रस्त्यावर नाचल्याबद्दल श्रेयाला नेटिझन्सनीही फटकारले होते.

श्रेया कालरा इंदौरच्या रासोमा स्क्वेअर येथील झेब्रा क्रॉसिंगवर डोजा कॅटच्या ‘वुमन’ या व्हायरल गाण्यावर नाचताना दिसली होती. इन्स्टाग्राम रीलमध्ये शेअर केलेल्या या व्हिडीओत ट्रॅफिक सिग्नल लाल झाल्यावर गाड्या थांबल्यानंतर श्रेया कालरा रस्त्यावर थिरकताना दिसते. तिला पाहून पादचारी आणि वाहनचालकही गोंधळलेल्या अवस्थेत होते. पब्लिक ट्रेण्डसाठी दिलेल्या डेअरचा हा भाग असल्याचं त्या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, हा ३० सेकंदांचा व्हिडिओ लाल सिग्नल असताना चित्रित करण्यात आला होता आणि रहदारीचे नियम मोडण्याचा आपला हेतू नव्हता, असे तिने स्पष्ट केले आहे. “कृपया वाहतुकीचे नियम मोडू नका. लाल सिग्नलचा अर्थ असा आहे की तुम्हाला थांबावे लागेल, मी नाचत आहे म्हणून थांबू नका आणि तुमचे मास्क घाला.” असे व्हिडीओ कॅप्शन अपडेट करत तिने लिहिले होते.

गृहमंत्र्यांकडून कारवाईचे आदेशश्रेयाच्या स्पष्टीकरणानंतरही मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, जे इंदौरचे पालकमंत्री देखील आहेत, यांनी अधिकाऱ्यांना तिच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. याबाबत त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीटही केले आहे, “मी ट्रॅफिक सिग्नलवर फ्लॅश मॉब करणाऱ्या मॉडेलवर नियमांनुसार कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. फ्लॅश मॉब्समागील भावना काहीही असली तरी ही पद्धत चुकीची आहे. ” असं मिश्रा म्हणाले होते. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी मोटार वाहन कायद्यांतर्गत तिच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशInstagramइन्स्टाग्रामCrime Newsगुन्हेगारी