शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 07:51 IST

भाजपचे सर्वाधिक १४ नगरसेवक डोंबिवलीतून बिनविरोध जिंकले...

मुंबई : राज्यातील विविध महापालिकांमध्ये तब्बल ७० नगरसेवक हे बिनविरोध निवडून गेले आहेत. आजवरचा हा सर्वांत  मोठा आकडा आहे. महापालिकेच्या विजयाची ही आमच्यासाठी नांदी असल्याचे भाजपने म्हटले आहे. 

भाजपचे सर्वाधिक १४ नगरसेवक हे कल्याण-डोंबिवलीत जिंकले. त्याचे श्रेय मुख्यत्वे डोंबिवलीचे आमदार असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाण्यात शिंदेसेनेचे ७ जण बिनविरोध जिंकले. पनवेलमध्ये ७ उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे येथे भाजपचे ६ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. येथून भाजपचे नितीन पाटील सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाले आहेत. आयोगाने घेतली दखलइतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. निवडणूक बिनविरोध करताना कोणाकडून दबाव आला होता का, आमिषे दाखविण्यात आली होती का याबाबतचे अहवाल आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मागविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक असेमहापालिका    भाजप    शिंदेसेना    राष्ट्रवादी (अजित पवार)    इस्लामिक पार्टी    अपक्षपुणे    २    ०    ०    ०    ०पिंपरी चिंचवड     २    ०    ०    ०    ०पनवेल    ६    ०    ०    ०    १ ठाणे    ०    ७    ०    ०    ०भिवंडी    ६    ०    ०    ०    ०कल्याण-डोंबिवली     १४    ६    ०    ०    ०धुळे     ४    ०    ०    ०    ०मालेगाव    ०    ०    ०    १    ०जळगाव     ६    ६    ०    ०    ०अहिल्यानगर    ३    ०    २    ०    ०एकूण    ४३    १९    २    १    १

गोळीबार अन् तुंबळ हाणामारी; भाजप उमेदवाराचा दीर झाला जखमी -धुळे : अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी देवपूर परिसरात संघर्षाने हिंसक वळण घेतले. उमेदवारी मागे घेण्याच्या आणि ‘पॅनेल’ फोडण्याच्या वादातून प्रभाग ५ मध्ये भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी, तसेच नेहरूनगर परिसरात झालेल्या गोळीबारात भाजप महिला उमेदवाराचे दीर उमेश उर्फ बंटी कांबळे गंभीर जखमी झाले. हाणामारीत राष्ट्रवादी (अजित पवार)चे शहराध्यक्ष कैलास चौधरी हे जखमी झाले.

राष्ट्रवादी (अजित पवार)चे शहराध्यक्ष कैलास चौधरी यांच्या मातोश्री कमलबाई चौधरी उमेदवार आहेत. तेथून भाजपतर्फे संध्या सागर कदम-कांबळे या उमेदवार आहेत. या दोन्ही गटांत हाणामारी झाली. बंटी कांबळे यांच्या पोटात गोळी खोलवर गेली.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Civic Polls: 70 Councilors Elected Unopposed; BJP Leads

Web Summary : Seventy councilors were elected unopposed in Maharashtra's municipal elections, a record number. BJP secured 43 seats, followed by Shinde's Shiv Sena with 19. Election Commission investigates potential coercion or inducements during unopposed elections. Conflicts arose in Dhule during candidate withdrawals.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv Senaशिवसेना