शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
2
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
3
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
4
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी;अनेकांची गेली दृष्टी,७ जणांची मृत्यूशी झुंज
5
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
6
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
7
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
8
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
9
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
10
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
11
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
12
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
13
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
14
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
15
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
16
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
17
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
18
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
19
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
20
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Daily Top 2Weekly Top 5

आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 09:23 IST

'महायुती' असो वा 'महाविकास आघाडी', स्थानिक पातळीवर मित्रपक्षांनीच एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याने यंदाची निवडणूक ही 'सर्व विरुद्ध सर्व' अशीच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी प्रमुख महापालिकांत थेट दोनपेक्षा अधिक आघाड्यांमध्ये लढत होणार आहे.

मुंबई : २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता युती आणि आघाड्यांचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. 'महायुती' असो वा 'महाविकास आघाडी', स्थानिक पातळीवर मित्रपक्षांनीच एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याने यंदाची निवडणूक ही 'सर्व विरुद्ध सर्व' अशीच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी प्रमुख महापालिकांत थेट दोनपेक्षा अधिक आघाड्यांमध्ये लढत होणार आहे.

कोणत्या विभागात नेमके काय झाले?नाशिक विभागात गटबाजीचा उच्चांक -नाशिक : भाजप स्वबळावर. शिंदेसेना–राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र. तर महाविकास आघाडी + मनसे एकत्र. येथे गटबाजीचा मोठा उद्रेक.मालेगाव : एमआयएम, मालेगाव सेक्युलर फ्रंट, भाजप, शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहेत.

सर्वाधिक विखुरलेली राजकीय लढत येथे होत आहे.अहिल्यानगर : भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार) युती. शिंदेसेना स्वतंत्र.काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार)–उद्धवसेना एकत्र आले आहेत.

युती असूनही तिहेरी संघर्ष.जळगाव : भाजप–शिंदेसेना एकत्र. उरलेले पक्ष स्वतंत्र लढत आहेत. मर्यादित पण बंडखोरी झाली आहे.धुळे : भाजप विरुद्ध शिंदेसेना–राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध उद्धवसेना–राष्ट्रवादी (शरद पवार)–काँग्रेस–मनसेआघाडी विस्कळीत.

पुणे विभागात आघाड्यांचा गोंधळ शिगेलापुणे : भाजप स्वतंत्र. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. काँग्रेस–उद्धवसेना–मनसे एकत्र. शिंदेसेना स्वतंत्र.चार आघाड्या, बंडखोरी आहे.पिंपरी–चिंचवड : भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी तर शिंदेसेना विरुद्ध काँग्रेस–उद्धवसेना–मनसेसर्वाधिक फाटाफूट आहे.सोलापूर : भाजप विरुद्ध शिंदेसेना–राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध महाविकास आघाडीकोल्हापूर : भाजप–शिंदेसेना–राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र. काँग्रेस–उद्धवसेना विरुद्धआघाडी झाली असली तरी स्थानिक पातळीवर बंडखोरी.इचलकरंजी : महायुती विरुद्ध शिव-शाहू आघाडीस्थानिक पातळीवर स्वतंत्र आघाड्यांची उभारणी.सांगली–मिरज–कुपवाड : भाजप विरुद्ध काँग्रेस–राष्ट्रवादी (शरद पवार), विरुद्ध शिंदेसेना, विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार)विरुद्ध तिसरी आघाडीपाच बाजूंनी लढत, बंडखोरीचा येथे झाला आहे कळस.

कोकण विभाग -सर्वाधिक बंडखोरी, आघाड्यांची पूर्ण मोडतोड मुंबई : तीन आघाड्या थेट समोरासमोर आहेत.  भाजप–शिंदेसेना × उद्धवसेना–मनसे × काँग्रेस–वंचितकोणतीही आघाडी एकत्र न लढल्याने समन्वयाचा पूर्ण अभाव.बंडखोरीचा परिणाम म्हणून सर्व प्रभागांत बहुपक्षीय लढती.२२७ जागांसाठी १,७२९ उमेदवार रिंगणात आहेत.ठाणे : शिंदेसेनेचा बालेकिल्ला असतानाही भाजप स्वतंत्रपणे रिंगणात.उद्धवसेना, मनसे, काँग्रेस स्वतंत्र.राष्ट्रवादी (शरद पवार) व राष्ट्रवादी (अजित पवार) आमनेसामने.एकूण जागा १३१ असून ६४९ उमेदवार रिंगणात आहेत ७ जण बिनविरोध निवडून आले आहेत.नवी मुंबई : १११ जागांसाठी तब्बल ४९९ उमेदवार मैदानात असून एकही बिनविरोध नाहीथेट भाजप विरुद्ध शिंदेसेना असा सामना.युती असूनही स्थानिक पातळीवर समन्वय नाही.बंडखोरीमुळे फटका बसणार.उल्हासनगर : भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, वंचित सर्व स्वतंत्र.७८ जागांसाठी ४३२ उमेदवार रिंगणात.कोणतीही युती प्रत्यक्षात नाही.एकही बिनविरोध नाही.कल्याण–डोंबिवली : भाजप–शिंदेसेना एकत्र, पण राष्ट्रवादी (अजित पवार) स्वबळावर, उद्धवसेना–मनसे वेगळी तर काँग्रेस स्वतंत्र लढत आहे.आघाड्यांमध्ये बंडखोरी.भिवंडी : भाजप–शिंदेसेना विरुद्ध काँग्रेस स्वतंत्र, सप स्वतंत्रकोणताही समन्वय नाही.मिरा–भाईंदर : भाजप विरुद्ध शिंदेसेना थेट संघर्ष. उर्वरित सर्व पक्ष स्वतंत्र लढत आहेत.युती कागदावर, मैदानात संघर्ष.वसई–विरार : बविआ स्वतंत्र ताकद म्हणून मैदानात.भाजप–शिंदेसेना एकीकडे, उद्धवसेना वेगळी.तिरंगी लढत.पनवेल : भाजप–शिंदेसेना विरुद्ध महाविकास आघाडी + इतर पक्ष.आघाड्यांचे पुनर्रचना स्वरूप, पण अंतर्गत मतभेद कायम.

अमरावती विभाग -अमरावती : भाजप, शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, बसप, वंचित, एमआयएम – सर्व स्वतंत्र.बहुपक्षीय संघर्ष आहे. अकोला : भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध, शिंदेसेना–काँग्रेस–राष्ट्रवादी (शरद पवार) – उद्धवसेना –वंचित–एमआयएमनागपूर विभागनागपूर : भाजप–शिंदेसेना विरुद्ध काँग्रेस, इतर गट स्वतंत्रबहुपक्षीय संघर्ष.चंद्रपूर : भाजप–शिंदेसेना, विरुद्ध उद्धवसेना–वंचित, विरुद्ध काँग्रेसतिहेरी बंडखोरी.

छत्रपती संभाजीनगर विभाग -छत्रपती संभाजीनगर : भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना स्वतंत्र. काँग्रेस विरुद्ध एमआयएम.विस्कळीत चित्र.नांदेड : भाजप + शिंदेसेना, काँग्रेस–वंचितपरभणी : राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध उद्धवसेना–काँग्रेसआघाडी तुटलेली.जालना : सर्व पक्ष स्वतंत्र. सर्वच जागांवर थेट बहुपक्षीय संघर्ष. लातूर : भाजप विरुद्ध काँग्रेस–वंचित.दोन गट, पण आघाड्यांचा अभाव.

बंडखोरी आणि युतीमधील बिघाडी काय सांगते?मिरा-भाईंदर, नवी मुंबई, आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेसेना असा थेट सामना आहे. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढत आहे, तर त्यांच्या विरोधात शिंदेसेना आणि अजित पवार गट एकत्र आहेत.महाविकास आघाडीतील फाटाफूट कुठे?अनेक ठिकाणी काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गट वेगवेगळे लढत आहेत. सांगलीत उद्धवसेना आणि मनसे 'तिसरी आघाडी' करून काँग्रेस-शरद पवार गटाच्या विरोधात उभे आहेत. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी-भाजप युती विरुद्ध शिंदेसेना विरुद्ध मविआ असा विचित्र त्रिकोण पाहायला मिळत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance Failures, Rebellion Surge: Clear Picture After Nomination Withdrawals

Web Summary : Alliance chaos reigns in municipal elections. 'Mahayuti' and 'Mahavikas Aghadi' fracture, leading to multi-cornered fights across Maharashtra. BJP, Shinde Sena, and other parties contest independently, exposing deep-seated rebellion and disunity.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस