बॉलीवुडच्या गाण्यावर थिरकला सरकारी शाळेतील शिक्षक, याला पाहुन तुम्हाला आठवेल 'हा' हिरो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 19:26 IST2021-09-09T19:25:16+5:302021-09-09T19:26:59+5:30

शाळेतील मुलांचे तुम्ही अनेक व्हिडिओज पाहिले असतील. यामध्ये मुलं डान्स करतात, काहीजण गाणं गातात तर काहीजण कुत्रा-मांजराचे आवाजही काढतात. असाच व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. पण हा व्हिडिओ कुठल्या शाळकरी मुलाचा नसुन शिक्षकाचा आहे. या गाण्यात शिक्षकाने जे काही केले आहे ते निव्वळ भन्नाट आहे...

sikkim goverment school teacher dance on Bollywood song video goes viral | बॉलीवुडच्या गाण्यावर थिरकला सरकारी शाळेतील शिक्षक, याला पाहुन तुम्हाला आठवेल 'हा' हिरो

बॉलीवुडच्या गाण्यावर थिरकला सरकारी शाळेतील शिक्षक, याला पाहुन तुम्हाला आठवेल 'हा' हिरो

शाळेतील मुलांचे तुम्ही अनेक व्हिडिओज पाहिले असतील. यामध्ये मुलं डान्स करतात, काहीजण गाणं गातात तर काहीजण कुत्रा-मांजराचे आवाजही काढतात. असाच व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. पण हा व्हिडिओ कुठल्या शाळकरी मुलाचा नसुन शिक्षकाचा आहे. या गाण्यात शिक्षकाने जे काही केले आहे ते निव्वळ भन्नाट आहे...

हा व्हिडीओ सिक्कीम राज्यातील एका सरकारी शाळेतील आहे. या शाळेच्या मैदानात ‘लत लग गयी’ या हिंदी गाण्यावर हा शिक्षक डान्स करताना दिसत आहे. याच्या डान्स मुव्हज तुम्हाला हैराण करुन सोडतील.  शिक्षक काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट अशा साध्या वेशात आहे. वेश जरी साधा असला तरी या शिक्षकाच्या अंगी सर्वांना चकित करुन सोडणारे गुण आहेत.

शिक्षकाच्या याच गुणांमुळे नेटकरी प्रभावित झाले आहेत. व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच या मजेदार व्हिडीओला शेअर करत आहेत. सध्या चर्चेत आलेल्या व्हिडीओला फेसबुकच्या Viva La Danza या पेजवर पाहता येईल.

Web Title: sikkim goverment school teacher dance on Bollywood song video goes viral