हे फोटो आहेत रशियातील एका गॅस स्टेशनवरील. समारा येथील हे गॅस स्टेशन आहे. इथे कुणी बिकीनी घालून आलं तर त्यांना गॅस फ्री मिळणार. झालं लोकांनी या ऑफरचा चांगलाच फायदा करून घेतला. पण सगळे पुरूष बिकीनी घालून आले होते. कसं ते पाहू....

समारातील ओल्वी गॅस स्टेशनचा हा किस्सा आहे. या गॅस स्टेशनच्या मार्केटिंग टीमने बिझनेस वाढवण्यासाठी ही आयडिया शोधून काढली होती. म्हणजे जर इथे कुणी बिकीनी घालून आलं तर त्यांना गाडीत फ्री गॅस भरून दिला जाईल. याने बिझनेसही वाढेल आणि गॅस स्टेशनचा प्रचारही होईल. पण ही ऑफर एका दिवसासाठी आणि केवळ तीन तासांची होती.

आता फ्रीमध्ये गॅस मिळणार म्हटल्यावर लोकांनी बिकीनी घालून तिथे येण्याचा सपाटा लावला. सगळं काही ठीक झालं होतं. फक्त गॅस स्टेशनमधील लोकांनी बिकीनी घालून येण्यासाठी जेंडरची काही अटच घातली नव्हती. त्यामुळे सगळे पुरूष इथे आलेत.

रशियातील अशाप्रकारची संकल्पना नंतर आली. याआधी ही आयडिया युक्रेनमधे एका गॅस स्टेशनवर करण्यात आली होती. त्यावेळीही अनेक पुरूषांनी बिकीनी घालून फायदा करून घेतला होता.


Web Title: Russian gas station free fuel bikini pics goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.