Raipur man serving golgappas with unique jugaad ias officer praises see viral video | लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...

लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...

पाणीपुरी म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. असं क्वचितचं कुणी असेल ज्याला पाणीपूरी अजिबात आवडत नाही. अनेकदा रस्त्यावरून जाताना एखादा पाणीपुरीचा ठेला दिसला तर तोंडाला पाणी सुटतं. अनेकदा तर आपसूकच आपली पावलं त्या ठेल्याकडे वळतात. पण गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरी खायला हवी की नको असा प्रश्न सगळ्यांनचा पडतो कारण कोरोनाच्या भीतीमुळे लोक बाहेरच खायला घाबरतात. बाहेरच्या गाड्यांवर स्वच्छता पाळली जात असेल का, असा प्रश्न पडतो.आज आम्ही तुम्हाला एका पाणीपुरीवाल्याचा भन्नाट व्हिडीओ दाखवणार आहोत. हा व्हिडीओ छत्तीसगमधील आहे,.

कोरोनापासून बचावासाठी या पाणीपुरीवाल्यानं भन्नाट शक्कल लढवली आहे. जेणेकरून  ग्राहकांना कोणतीही भीती न बाळगता मनसोक्त पाणीपुरीचा आनंद घेता येईल. या माणसानं आपल्या लहानश्या दुकानात पाणीपुरीचं एक मशीन बसवलं आहे.  कोरोनाचा  संसर्ग टाळण्याासाठी ही शक्कल लढवली आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.  सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता हातात ग्लोव्ह्ज घालून पाणीपुरीवाला पाणीपूरी देत आहे. त्यानंतर ग्राहक आरामाने आपल्याला हवं ते पाणी पुरीमध्ये टाकत आहेत. ही भन्नाट आयडीया पाहून ग्राहकाने खुश होऊन या माणसाला त्याच नाव विचारलं. त्यानं आपलं नाव स्वामी असल्याचे सांगितले आहे.  हा व्हिडीओ  १५ सप्टेंबला शेअर करण्यात आला होता. त्यानंतर या व्हिडीओला २० हजारांपेक्षा जास्त व्हूव्हज आणि ३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स तसंच ४०० पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. सोशल मीडिया युरर्सनी या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे. 

हे पण वाचा-

VIDEO : चोरी गेलेला फोन सापडला जंगलात, गॅलरी चेक केल्यावर जे दिसलं ते पाहून बसला धक्का!

Video : मास्क न घातला हंसाजवळ गेली अन् हंसाने रागात 'या' महिलेसोबत केलं असं काही...

बापरे! रस्त्याच्या कडेला पांढरी चादर ओढून झोपलेल्या माणसाला लोक मृतदेह समजले अन् मग....

हाताने नाकावरचे पिंपल्स फोडणं चांगलंच अंगाशी आलं; मेंदूत झालं गंभीर इन्फेक्शन अन् मग...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Raipur man serving golgappas with unique jugaad ias officer praises see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.