Video : मास्क न घातला हंसाजवळ गेली अन् हंसाने रागात 'या' महिलेसोबत केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 01:27 PM2020-09-14T13:27:56+5:302020-09-14T13:31:29+5:30

२ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि ८३ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. 

Woman was taught how to wear a face mask properly by an irate swan viral video | Video : मास्क न घातला हंसाजवळ गेली अन् हंसाने रागात 'या' महिलेसोबत केलं असं काही...

Video : मास्क न घातला हंसाजवळ गेली अन् हंसाने रागात 'या' महिलेसोबत केलं असं काही...

Next

सोशल मीडियावर एका हंसाचा आणि महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहून हंसाचे नक्कीच कौतुक करला. या व्हिडीओमध्ये  हंसपक्षी महिलेला मास्क कसा लावायचा हे शिकवत आहे. गेल्या ६-७ महिन्यापासून मास्क वापरणं हा जीवनाचा महत्वपूर्ण भाग बनलं आहे. मास्कचा वापर न केल्यास कोरोना संसर्गाचा धोका कित्येक पटीनं वाढतो. जागतिक आरोग्य  संघटनेनं मास्कच्या वापराबाबात अनेक गाईडलाईन्स दिल्या आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. 

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक महिला बागेत हंसाच्या समोर बसलेली दिसून येईल.  या महिलेनं मास्क तोंडाच्या खाली लावला होता. नाक किंवा तोंड काहीही या मास्कमुळे झाकलं गेलं नव्हतं. हे पाहून हंसाला राग आला म्हणून त्यांना आपल्य चोचीनं मास्क महिलेच्या तोंडाला लावला. हा व्हिडीओ फ्रान्सचा आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, या व्हिडीओतून तुम्हाला सांगायचं आहे की, मास्कचा वापर करा.

हा व्हिडीओ १० सप्टेंबरला सोशल मीडियावर शेअर करण्यात  आला होता.  कोट्यावधी लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओ पसंती दिली आहे. २ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि ८३ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मास्कचा वापर करायलाच हवा असा संदेश या व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे. 

हे पण वाचा-

१ नंबर जोडपं! आजारपणात पत्नीनं साथ सोडली; पतीनं बनवला तिचा हुबेहूब पुतळा 

पोलीस उपनिरीक्षक शांतप्पा दररोज शिकवितात मजुरांच्या मुलांना

Web Title: Woman was taught how to wear a face mask properly by an irate swan viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.