आपण सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ आणि फोटोज बघत असतो. यांपैकी काही व्हिडिओ अथवा फोटो आपल्याला बरेच काही शिकवून जाणारे असतात तर काही मनाला सुन्न करणारेही असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदस्त व्हायरल होत आहे. यात, एक पोलीस अधिकारी ट्रेनमध्ये गाढ झोपलेल्या एका प्रवाशाच्या खिशातून अगदी सहजपणे मोबाईल फोन काढताना दिसत आहे.
खरेतर हा एक अवेअरनेस व्हिडिओ आहे, अर्थात पोलिसांनी जनतेला जागरूक करण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. मात्र असे असले तरी, ही चोरी मात्र खरी आहे. कारण व्हिडिओमध्ये दिसत असलेली संबंधित झोपलेली व्यक्ती एक प्रवासी आहे. आपला मोबाईल चोरीला गेला, हे या व्यक्तीच्या लक्षातही आले नाही.
पोलिसांनी सहजपणे काढून घेतला फोन - या व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी वरच्या बर्थवर झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून सहजपणे मोबाईल काढताना दिसत आहे. यानंतर, "बघा, किती गाढ झोपेत आहे... निघाला मोबाईल... झाले २५-५० हजाराचे नुकसान यांचे. बघितले, असेच तर काढून जातात लोक. आता यांना उठवून आपण हा मोबाईल यांना देऊया."
यानंतर, पोलीस या प्रवाशाला उठवतात आणि त्याच्या मोबाईल संदर्भात विचारतात? तेव्हा हा प्रवासी उठून बसतो आणि खिसा तपासतो, तर मोबाईल गायब असतो. यामुळे संबंधित प्रवासी काहीसा गडबडतो. यानंतर पोलीस त्याचा मोबाईल त्याला परत करतात आणि काळजी घ्ययाला सांगतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स पोलिसांचे कौतुक करत आहेत.