Payal Gaming च्या MMS लीक प्रकरणात झाली पहिली अटक! महाराष्ट्र सायबर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:59 IST2026-01-12T12:57:06+5:302026-01-12T12:59:03+5:30
Payal Gaming MMS Leak Case: पायलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ AI डीपफेक करून व्हायरल करण्यात आला होता

Payal Gaming च्या MMS लीक प्रकरणात झाली पहिली अटक! महाराष्ट्र सायबर पोलिसांची कारवाई
Payal Gamingg MMS leak Case: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि स्पोर्ट्स क्रिएटर पायल धारे ही 'पायल गेमिंग' (Payal Gaming) म्हणून ओळखली जाते. तिच्या नावे एक आक्षेपार्ह आणि बनावट व्हिडिओ (MMS) व्हायरल करणाऱ्या संशयिताला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली. ११ जानेवारीला समोर आलेल्या माहितीनुसार, पायलने डिसेंबर २०२५ मध्ये केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ही कारवाई केली.
नेमके प्रकरण काय?
डिसेंबर २०२५च्या मध्ये टेलिग्राम आणि 'X' (ट्विटर) सारख्या प्लॅटफॉर्मवर पायल गेमिंगचा असल्याचा दावा करत एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, पायलने तात्काळ समोर येत हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आणि 'डीपफेक' (Deepfake) असल्याचे स्पष्ट केले. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून पायलचा चेहरा दुसऱ्याच्या शरीरावर लावून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचेही तिने म्हटले. तसेच, पायलने याप्रकरणी खंबीर भूमिका घेत पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली.
पोलिसांची कारवाई आणि तपास
पायलने केलेल्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र सायबर विभागाने प्रगत फॉरेन्सिक टूल्सचा वापर करून या व्हिडिओच्या 'डिजिटल फूटप्रिंट्स'चा मागोवा घेतला. तपासात असे आढळले की, हा व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाने तयार केलेला असून त्यात अनेक तांत्रिक त्रुटी (Artifacts) होत्या. पोलिसांनी या आक्षेपार्ह आशयाचा प्रसार करणाऱ्या पहिल्या काही व्यक्तींपैकी एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. या व्यक्तीवर माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमान्वये विनयभंग आणि बदनामीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पायलची प्रतिक्रिया
या कारवाईनंतर पायलने पोलिसांचे आभार मानले आहेत. तिने म्हटले की, "तंत्रज्ञानाचा वापर महिलांना लक्ष्य करण्यासाठी केला जाणे हे दुर्दैवी आहे. मात्र, पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे मला न्याय मिळेल अशी आशा आहे." तिने इतर महिलांनाही अशा सायबर गुन्ह्यांविरुद्ध गप्प न बसता आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
पायल गेमिंग युट्यूब स्टार MrBeast कोलॅबोरेशन
कथित १९ मिनिटांच्या व्हायरल व्हिडिओवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, लोकप्रिय भारतीय गेमिंग स्ट्रीमर पायल धरे उर्फ Payal Gaming हिने असा धक्का दिला की सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेली पायल, आता एका अनपेक्षित कारणामुळे पुन्हा एकदा हेडलाईन्समध्ये आली आहे.
पायल गेमिंगचा थेट जागतिक युट्यूब स्टार MrBeast सोबतचा धक्कादायक कोलॅबोरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. या अचानक समोर आलेल्या सहकार्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, हा विषय सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.