शहामृग लागला मागे, व्हिडिओ काढणाऱ्याची पळता भुई झाली थोडी, लोक म्हणाली, भाग मिल्खा भाग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 12:54 IST2021-07-27T12:43:18+5:302021-07-27T12:54:50+5:30

शहामृग आहेच असा की त्याला बघुन आवडण्यापेक्षा त्याची भीतीच जास्त वाटते. त्याची एक लाथ कुणालाही वैकुंठाची सफर घडवून आणेल. जरा विचार करा हा शहामृग तुमच्या पाठी लागला तर?

The ostrich was running behind the man, people said run fast, video goes viral | शहामृग लागला मागे, व्हिडिओ काढणाऱ्याची पळता भुई झाली थोडी, लोक म्हणाली, भाग मिल्खा भाग!

शहामृग लागला मागे, व्हिडिओ काढणाऱ्याची पळता भुई झाली थोडी, लोक म्हणाली, भाग मिल्खा भाग!

तुम्हाला पक्षी आवडत असतील तर कोणते आवडतात? पोपट, काकाकुवा किंवा आणखी काही सुंदर पक्षी. पण तुम्ही कधी ऐकलंय का की कुणाला शहामृग आवडतो. थोड कठीणच वाटतंय ना? अहो शहामृग आहेच असा की त्याला बघुन आवडण्यापेक्षा त्याची भीतीच जास्त वाटते. त्याची एक लाथ कुणालाही वैकुंठाची सफर घडवून आणेल. जरा विचार करा हा शहामृग तुमच्या पाठी लागला तर?

ट्वीटरवर फ्रेड स्कल्ज Fred Schultz या युजरने एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात एका शहामृगाने एका माणसाची चांगलीच पाठ धरलीये. या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की, यातील व्यक्ती गाडीमध्ये आहे. पण शहामृगाचा स्पीड तर बघा तो काही या व्यक्तीची पाठ सोडायला तयार नाही. त्यात ते शहामृग असे काही चित्रविचित्र आवाज काढतंय की ते ऐकुनच तुम्ही पोट धरुन हसाल. एखादी मुलगी जोराच किंचाळते असा या शहामृगाचा आवाज आहे. 

आतापर्यंत या व्हिडिओला ११ हजारच्या वर व्हिव्ज मिळाले आहेत. नेटकरी हा व्हिडिओ पाहुन पोट धरुन हसतायत. काहीजण मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. ते कमेंट करून व्हिडिओतील व्यक्तीला सल्लाच देतायत की, या शहामृगापासून वाचायच असेल तर लवकर पळ मित्रा...

Web Title: The ostrich was running behind the man, people said run fast, video goes viral