शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'हा' IAS अधिकारी १० किलोमीटर पायी चालत जाऊन खरेदी करतो भाजी, कारण वाचून व्हाल त्याचे फॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 14:32 IST

सामान्यपणे एखादा आयएएस अधिकारी म्हटला की, गाड्यांचा लवाजमा, सुरक्षा रक्षक असं चित्र बघायला मिळतं.

सामान्यपणे एखादा आयएएस अधिकारी म्हटला की, गाड्यांचा लवाजमा, सुरक्षा रक्षक असं चित्र बघायला मिळतं. पण सध्या सोशल मीडियात जमिनीशी नाळ जुळलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फोटो आहे मेघालयाचे आयएएस अधिकारी राम सिंह यांचा. सोशल मीडियात त्यांची चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे ते १० किलोमीटर पायी चालत जाऊन भाजी खरेदी करतात. एका इतक्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याने अशाप्रकारे वेगळेपण जपणं हे लोकांसाठी फारच आश्चर्याचं ठरत आहे. राम सिंह हे मेघालयातील वेस्ट गारो हिल्समध्ये डेप्युटी कमिश्नर आहेत.

२४ सप्टेंबरला Oxomiya Jiyori नावाच्या यूजरने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. यात सांगण्यात आलं की, राम सिंह हे दर आठवड्याला हिरव्या भाज्या खरेदी करण्यासाठी १० किमोमीटर पायी चालत जातात. ते स्थानिकांकडून २० ते २५ किलो भाजी खरेदी करतात.

राम सिंह यांचे फोटो फेसबुकवरही शेअर करण्यात आले आहेत. त्यांनी पाठीवर एक बांबूची मोठी टोपली घेतली आहे. ज्यात ते भाज्या आणतात. देशाला प्लॅस्टिक फ्रि करण्यासाठी ते याद्वारे संदेशही देत आहेत. ही बांबूची टोपली सुद्धा स्थानिक लोकांकडून तयार करण्यात आली आहे. 

EastMojo नावाच्या एका वेबसाइटला त्यांनी सांगितले की, लोकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी म्हणून ते पायी चालत भाजी घ्यायला जातात. याने ट्रॅफिक जॅम कमी होईल. लोकांनी प्लॅस्टिकचा वापरही टाळावा. ते म्हणाले की, ते गेल्या सहा महिन्यांपासून अशाप्रकारे पायी भाजी घ्यायला जातात.

राम सिंह यांचं एक इन्स्टाग्राम पेज असून त्यावर दिसून येतं की ते फिटनेसबाबत किती जागरूक आहेत. खरंतर असे आणखी जागरूक अधिकारी देशाला मिळाले तर लोकांचे अच्छे दिन नक्कीच येतील.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके