A little kid running landcruiser at high speed on the road viral video will surprise you | बाबो! ५ वर्षांचा चिमुरडा पळवतोय Landcruiser; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल

बाबो! ५ वर्षांचा चिमुरडा पळवतोय Landcruiser; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल

तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल लहान मुलांना मोटारसायकल किंवा सायकल चालवायला खूप आवडतं. पण लहान मुलांना आईवडील कधीही गाडी चालवायला देत नाहीत. मुलं कितीही आग्रह करतात तरीही परवानगी देत नाहीत. आपण लहान वयातच मुलांना बर्‍याच वेळा सायकल चालवताना पाहिले असेल. परंतु, आपण कधीही लहान मुलास लँड क्रूझर सारखी मोठी गाडी चालवताना पाहिले आहे?. लँड क्रूझरचे नाव ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल, की लहान मूल इतकी मोठी कार कशी चालवू शकते.?

सध्या सोशल मीडियावर असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक लहान मूल रस्त्यावर लँड क्रूझर चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओवर लोकांना विश्वास ठेवणे कठीण आहे. या व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की एक ५ वर्षांचा मुलगा ब्लॅक कलरच्या लँड क्रूझरमध्ये मोठ्या मजेत रस्त्यावर धावत आहे. लहान मुलाने लँड क्रूझर चालवताना पाहून लोकांचे डोळे उघडेच राहिले आहेत. घटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया.... 

ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरनं मुलतान शहर असल्याचे नमुद केले आहे. मुलतानमध्ये गर्दी असलेल्या रोडवर लँड क्रूझरसारखी मोठी गाडी चालवित आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच लोक आश्चर्यचकित आहेत कारण प्रत्येकजण असा विचार करीत आहे की हे कसे शक्य आहे. हा चिमुरडा कोणत्यातरी शर्यतीत धावत असल्याप्रमाणे जात आहे.  या व्हिडीओमागची सत्यता अजूनही पडताळण्यात आलेली नाही. गायला सुरूवात करताच कुत्रा-मांजरांसह माणसांनी केलं असं काही; रेहमानने शेअर केला भन्नाट VIDEO

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A little kid running landcruiser at high speed on the road viral video will surprise you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.