शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या सोशल मीडियात धुमाकूळ घालणारी ट्रम्प प्रशासनातील 'ही' सर्वात कमी वयाची अधिकारी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 13:34 IST

२०२२ साली लेविटने अमेरिकन काँग्रेसची निवडणूक लढवली. न्यू हॅम्पशायर काँग्रेस जिल्हा प्रतिनिधित्व करण्यासाठी रिपल्बिकन पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला परंतु निवडणुकीत पराभव सहन करावा लागला.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर टॅरिफबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अनेक देशांना धक्का बसला. त्यात चीन आणि अमेरिकेत सध्या ट्रेड वॉर सुरू आहे. यातच डोनाल्ड ट्रम्प यांची निकटवर्तीय सहकारी चीनच्या इंटरनेट जगतात धुमाकूळ घालत आहे. इतिहासात सर्वात कमी वयाची व्हाइट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट मागील महिन्यात चीनमध्ये एक सोशल मिडिया सेलिब्रिटी म्हणून पुढे आली आहे. २७ वर्षीय कॅरोलिनचा अमेरिकेतली पत्रकारांशी भिडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

शेडोंग प्रांतातील एक सोशल मिडिया युजर झांग जीयी यांनी कॅरोलिन लेविटचा ४३ सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट करून म्हटलंय की, या सुंदर प्रवक्त्याची बेधडकता आणि स्वभाव पाहा. कुणीही निराश नाही. फक्त शांत आणि कुठल्याही दबावाविना आपल्या कामाबद्दल सजग आहे असं सांगितले. या क्लिपमध्ये लेविट एका प्रश्नाला उत्तर देताना दिसते. ट्रम्प यावर्षी व्हाइट हाऊसच्या कॉरेस्पोंडेंट्स असोसिएशनच्या डिनरमध्ये सहभागी होणार का असं विचारलं होते. त्याला कॅरोलिन लिवेट उत्तर देते. 

कोण आहे कॅरोलिन लेविट?

न्यू हॅम्पशायर राज्याच्या ७ हजार लोकसंख्येच्या छोट्या शहरात जन्मलेली लेविट तिच्या कुटुंबातील कॉलेजमध्ये पदवी घेतलेली पहिली महिला होती. ट्रम्प प्रशासनाच्या पहिल्या कार्यकाळात असिस्टेंट प्रेस सेक्रेटरी आणि प्रेसिडेंशियल रॉयटर होती. २०२१ मध्ये तिने न्यूयॉर्कच्या रिपल्बिक काँग्रेस सदस्य एलिस स्टेफनिक यांच्याकडे काही काळ काम केले, ज्यांनी ट्रम्प यांना संयुक्त राष्ट्रात अमेरिकन राजदूत म्हणून सर्व्हिस देण्यासाठी नॉमिनेट केले होते. २०२२ साली लेविटने अमेरिकन काँग्रेसची निवडणूक लढवली. न्यू हॅम्पशायर काँग्रेस जिल्हा प्रतिनिधित्व करण्यासाठी रिपल्बिकन पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला परंतु निवडणुकीत पराभव सहन करावा लागला.

अलीकडेच लेविटचं निकोलस रिकियो यांच्याशी लग्न झाले. जे एक रियल इस्टेट डेवलपर आहेत आणि लेविटपेक्षा वयाने ३२ वर्ष मोठे आहेत. लेविट ट्रम्प यांच्यासोबत काम करणारी एकमेव अमेरिकन पब्लिक फिगर नाही तर चीनच्या सोशल मीडियावर हिट झाली आहे. लेविट हिच्या बोलण्याची शैली सर्वांना आवडत आहे. लेविट २७ वर्षाची असून ती व्हाईट हाऊसमधील सर्वात कमी वयाची युवा प्रेस सेक्रेटरी आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाchinaचीनSocial Viralसोशल व्हायरल