₹4 कोटी कमावणारा IIT पदवीधर विमानात 11 बिअर प्यायल्या; पँटमध्येच केली लघवी, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 20:09 IST2025-10-20T20:08:26+5:302025-10-20T20:09:00+5:30
अमेरिकेहून भारतात येणाऱ्या फ्लाइटमध्ये IIT मुंबईच्या माजी विद्यार्थ्याने लाजीरवाणे कृत्य केले.

₹4 कोटी कमावणारा IIT पदवीधर विमानात 11 बिअर प्यायल्या; पँटमध्येच केली लघवी, मग...
नवी दिल्ली- शिक्षण आणि संपत्ती माणसाला प्रतिष्ठा मिळवून देतात खरे, पण संस्कार आणि संयमच त्याचे व्यक्तिमत्त्व ठरवते. हे वाक्य एका भारतीय तरुणाला तंतोतंत बसते. अमेरिकेहून भारतात येणाऱ्या फ्लाइटमध्ये IIT मुंबईचा माजी विद्यार्थ्याने असे कृत्य केले, जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
सिलिकॉन व्हॅलीतील AI स्टार्टअपमध्ये वर्षाला सुमारे ₹4 कोटी कमावणाऱ्या एका तरुणाने फ्लाइटमध्ये 11 बिअर पिऊन लघवी केली. ही घटना सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली फ्लाइटमध्ये 18 ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेचे साक्षीदार आणि वैष्णव टेक्नॉलॉजीचे संस्थापक गौरव खेतरपाल यांनी संपूर्ण प्रसंग सोशल मीडियावर X वर शेअर केला आहे.
गौरवच्या म्हणण्यानुसार, त्याच्या शेजारी बसलेला 25 वर्षीय भारतीय तरुण एअर हॉस्टेसला सतत बिअर मागत होता. एअर होस्टेसने तीन बिअरनंतर नकार दिल्यावर त्याने आपल्या मित्रांकडून बिअर मागून घेतल्या. तब्बल 11 बिअर पिल्यानंतर तो झोपला.
On my SFO-Delhi flight today, the passenger next to me was a 25-year old Indian, IIT-Mumbai, earning almost $500K in an AI startup in Bay Area, heading home for Diwali.
— Gaurav Kheterpal (@gauravkheterpal) October 18, 2025
During the 16h flight, he gulped down 11 beers. When the flight attendant refused to give him more than 3…
काही वेळाने जाग आल्यावर, त्याने पँटमध्ये लघवी केल्याचे समजले. वर्षाला ₹4 कोटी कमावणारा, IIT सारख्या संस्थेचा सुशिक्षित माणूस फुकट बिअरसाठी स्वतःला इतक्या खालच्या पातळीवर नेईल, हे पाहून दुःख झाले. लघवीच्या दुर्गंधीमुळे इतर प्रवाशांना आपली सीट बदलावी लागली.
सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया
गौरवच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चा आणि रोषाची लाट उसळली. अनेकांनी त्या युवकाच्या वर्तनाची कडक निंदा केली. काहींनी या घटनेला भारतीयांची परदेशातील प्रतिमा कलंकित करणारी म्हटले. शिक्षण मिळाले म्हणून माणूस संस्कारी होतो असे नाही. संस्कार घरातून येतात, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली.