शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

१ किलो मिठामध्ये किती दाणे असतात? चौघा मित्रांची 'सटकली' आणि मोजून काढले, पाहा किती असतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:58 IST

Salt Interesting Facts : एक किलो मिठाच्या पॅकेटमध्ये मिठाचे बारीक बारीक किती दाणे असतात? कदाचित नक्कीच केला नसेल.

Salt Interesting Facts : मीठ हा एक असा पदार्थ आहे ज्याच्याशिवाय काही खाण्याचा विचारही कुणाला करवत नाही. कारण मिठाशिवाय काही खाल्लं तर ते बेचव लागेल. हीच मिठाची खासियत आहे. स्वयपाक करताना अनेकजण अंदाजाने भाजी मीठ घालतात, तर जेवणात वरून चिमूटभर किंवा त्यापेक्षा जास्त घेतलं जातं. सामान्यपणे बाजारात गेल्यावर १ किलो मिठाचं एक पॅकेट किंवा दोन विकत घेतले जातात. इतकं मीठ बरेच दिवस पुरतं. मीठ किलोप्रमाणेच घेतलं जातं. पण आपण कधी विचार केलाय का की, एक किलो मिठाच्या पॅकेटमध्ये मिठाचे बारीक बारीक किती दाणे असतात? कदाचित नक्कीच केला नसेल. पण चार मित्रांमध्ये हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि त्यानी चक्क दाणे मोजून काढले. 

आता मिठाचे दाणे किती बारीक असतात हे आपल्याला माहीत आहेच. पण तरी सु्द्धा ते मोजण्याची हिंमत चौघांनी दाखवली. पण हे काम त्यांच्यासाठी काही सोपं नव्हतं. आपल्याला विश्वास बसणार नाही की, १ किलो मिठात किती दाणे असतात हे जाणून घेण्यासाठी त्यांना तब्बल ९ दिवसांचा कालावधी लागला. त्यांनी जी आकडेवारी काढली त्यानुसार १०० ग्रॅम मिठामध्ये १३ लाख ७५ हजार दाणे असतात. या हिशोबाने १ किलो मिठामध्ये तब्बल १ कोटी ३७ लाख ५० हजार इतके दाणे असायला हवेत. पण त्यांनी मोजले तेव्हा १ किलो मिठामध्ये १ कोटी ४२ लाख १३ हजार ७५३ दाणे निघाले.    

पण हा केवळ अंदाज मानला जाऊ शकतो. कारण एक्सपर्टनुसार, मिठांच्या दाण्यांचा आकार वेगवेगळे असतो. सामान्यपणे टेबल सॉल्टच्या दाण्यांचा आकार ०.३ ते ०.५ मिलीमीटर दरम्यान असतो. जर सरासरी पद्धतीने मोजणी केली तर १ किलो मिठामध्ये साधारण ५ कोटी ते ८ कोटी दाणे असू शकतात. काही लोकांनी ही संख्या ७० लाख ते ८ कोटीपर्यंत सांगितली. मुळात हे ठरतं ते मिठाच्या दाण्यांचा आकार किती छोटा किंवा मोठा आहे. 

एका अंदाजानुसार, जर एक दाणा ०.१ मिलीमीटरचा मानला गेला, तर १ किलो मिठात साधारण ८३ कोटी दाणे असू शकतात. पण प्रत्यक्षात मिठाचे दाणे यापेक्षा मोठ्या आकाराचे असतात. त्यामुळे त्यांची संख्या यापेक्षा कमी असते. 

English
हिंदी सारांश
Web Title : How Many Salt Grains in a Kilo? Friends Counted!

Web Summary : Four friends painstakingly counted salt grains in a kilo, finding about 142 million. Estimates vary widely, depending on grain size, ranging from 50 million to over 800 million grains per kilo.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स