Ho Na Paayega Womans Rant About Returning To Office Is As Funny As It Is Relatable social media viral video | "अब नहीं हो पाएगा"; वर्क फ्रॉम होमची सवय लागलेल्या महिलेचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

"अब नहीं हो पाएगा"; वर्क फ्रॉम होमची सवय लागलेल्या महिलेचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

ठळक मुद्देएका महिलेचा भन्नाट व्हिडीओ झाला व्हायरलव्हिडीओला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती

कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. या कालावधीत अनेक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. यादरम्यान, कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिली होती. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरी अनेक जण अद्यापही वर्क फ्रॉम होमच करत आहेत. 

अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची संकल्पना आवडू लागली आहे. अशा अनेक गोष्टीही आहेत ज्या ऑफिसमध्ये जाऊन काम करताना शक्य होत नाहीत, त्या घरून कर्मचाऱ्यांना करता येत आहे. परंतु सध्या हळूहळू कार्यालयं मर्यादित कर्मचाऱ्यांच्या संख्येत सुरू होण्यासही सुरूवात झाली आहे. पण काही कर्मचाऱ्यांना अजूनही कार्यालयात जाण्याची इच्छा नसल्याचं दिसून येत आहे. अशातच एका कर्मचाऱ्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायपल होत आहे. 

सदर महिला ही या व्हिडीओत आपल्याला वर्क फ्रॉम होमची सवय झाल्याचं म्हणत आहे. तसंच कार्यालय बंद असल्यामुळे कार्यालयात येताना घालत असलेले सर्व कपडेही बांधून ठेवल्याचं ती सांगत आहे. वर्क फ्रॉम होम चांगलं असून पुन्हा ऑफिस सुरू न करण्याचंही ती म्हणताना दिसतेय. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामपासूनफेसबुकपर्यंतसोशल मीडियावर सर्वत्र धुमाकुळ घालत आहे. सर्वकाही चांगलं चालत आहे. कंपनीचा महसूलही वाढत आहे, पैसेही वाचत आहेत. तर अशा परिस्थितीत पुन्हा ऑफिस का सुरू करताय असंही ती या व्हिडीओतून विचारत आहे. तसंच आता कुर्ता आणि पायजम्यात राहण्याची आपल्याला सवय झाली आहे आणि आता आपल्याला इतर काही शक्य होणार नाही. जे लोकं म्हणतायत की आम्ही ऑफिसला मीस करतोय त्यांनी दुसऱ्यांना मुर्ख बनवावं असंही ती महिला म्हणत आहे. दरम्यान, आपण हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी बनवल्याचंही तिनं व्हिडीओच्या अखेरिस म्हटलं आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ho Na Paayega Womans Rant About Returning To Office Is As Funny As It Is Relatable social media viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.