लग्नात नवरदेवाची अशी एन्ट्री तुम्ही कधी पाहिली नसेल, व्हिडीओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 13:15 IST2019-11-29T13:15:40+5:302019-11-29T13:15:48+5:30
सामान्यपणे लग्नात नवरदेव एकतर घोडीवर येतो नाही तर कारने येतो. त्याही पलिकडे जाऊन काही लोकांनी हेलिकॉप्टरने लग्नात एन्ट्री घेतली.

लग्नात नवरदेवाची अशी एन्ट्री तुम्ही कधी पाहिली नसेल, व्हिडीओ व्हायरल...
सामान्यपणे लग्नात नवरदेव एकतर घोडीवर येतो नाही तर कारने येतो. त्याही पलिकडे जाऊन काही लोकांनी हेलिकॉप्टरने लग्नात एन्ट्री घेतली. पण आता एका नवरदेवाने याहूनही वेगळी अशी एन्ट्री घेतली असून याची चर्चा रंगली आहे. मेक्सिकोमधील एक नवरदेव लग्नासाठी थेट आकाशातून अवतरला.
वेगळेपणासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही याचंच हे उदाहरण म्हणता येईल. आकाश यादव आणि गगनप्रीत सिंह या कपलचं लग्न मेक्सिकोमध्ये होतं. यात आकाश एअरक्राफ्टने डाइव्ह करत लग्नात पोहोचला. हे लग्न मेक्सिकोमधील Los cabos मध्ये पार पडलं. आकाशच्या या धमाकेदार एन्ट्रीचा व्हिडीओ समोर आला असून WedMeGood या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलाय.
आकाशची लग्नात अशाप्रकारे एन्ट्री घेण्याचं पूर्व तयारी नव्हती. त्याने एका वृत्तपत्राला सांगितले की, आधी तो मित्रांसोबत आणि परिवारासोबत बोटीने येणार होता. पण त्याला माहिती मिळाली की, कायदेशीर कारणांमुळे तो असं करू शकत नाही. त्यामुळे त्याने एअरक्राफ्टने येण्याचा निर्णय घेतला.