हा टॉमी भलताच कारागिर! शांत बसलेली मुलगी, या पठ्ठ्याने मागून जाऊन केले असे काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 10:41 AM2021-07-27T10:41:27+5:302021-07-27T10:52:16+5:30

एक व्हिडिओ सध्या सोशलमिडियावर व्हायरल होतोय. यात एक मुलगी शांतपणे बसलेली असते पण तिच्या मागून येऊन कुत्रा जे काही करतो ते पाहुन तुम्ही हसून हसून वेडे व्हाल.

Dog pee on girl, watch this funny viral video | हा टॉमी भलताच कारागिर! शांत बसलेली मुलगी, या पठ्ठ्याने मागून जाऊन केले असे काही...

हा टॉमी भलताच कारागिर! शांत बसलेली मुलगी, या पठ्ठ्याने मागून जाऊन केले असे काही...

Next

माणसांपेक्षा प्राण्यांच्या करामती जास्त मजेशीर असतात. काहीवेळा प्राणी असे काही करून जातात की माणसांची हसून हसून पुरेवाट लागते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशलमिडियावर व्हायरल होतोय. यात एक मुलगी शांतपणे बसलेली असते पण तिच्या मागून येऊन कुत्रा जे काही करतो ते पाहुन तुम्ही हसून हसून वेडे व्हाल.

सोशल मिडियावर हा व्हिडिओ धुमाकुळ घालतोय. यात एक मुलगी शांतपणे बसलेली दिसते. तिच्या आजूबाजूला काही कुत्री फिरत असतात. त्याचवेळी एक कुत्रा तिच्या मागे येतो. हा तिथे कशासाठी आला आहे? असा प्रश्न पडण्याआधीच तो कुत्रा तिथे लघवी करून निघून गेलेला असतो. ती मुलगी पटकन मागे वळते. बघतेतर काय कुत्र्याने तिच्या पाठीवर लघवी केलेली आहे. 

हा व्हिडिओ घंटा या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट करण्यात आला आणि त्यानंतर तो तुफान व्हायरल झाला. जो कोणी हा व्हिडिओ पाहतोय तो त्या मुलीची यथेच्छ टेर उडवतोय. नेटकरी अगदी चवीनं हा व्हिडिओ बघुन पोटभर हसत आहेत. ही बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला १ लाखाच्यावर लाईक्स मिळाले होते.

तुमच्या घरातही पाळीव कुत्रे असतील. गल्ल्यांमध्ये तर कुत्रे असतातच असतात. समजा तुमच्यासोबत असा प्रसंग घडला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल?

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dog pee on girl, watch this funny viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app