शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

"संतापजनक, रणवीर अलाहाबादियापेक्षाही वाईट"; पॉलिसीबाजारच्या 'त्या' जाहिरातीवर टीकेची झोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 09:43 IST

पॉलिसबाजारच्या एका जाहिरातीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. कुटुंबासाठी लाईफ इंश्योरन्स पॉलिसी कव्हरेजचा प्रचार केला आहे. मात्र त्यामधील असंवेदनशील कथानकावर आता प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

पॉलिसबाजारच्या एका जाहिरातीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. कुटुंबासाठी लाईफ इंश्योरन्स पॉलिसी कव्हरेजचा प्रचार केला आहे. मात्र त्यामधील असंवेदनशील कथानकावर आता प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. "संतापजनक, रणवीर अलाहाबादियापेक्षाही अत्यंत वाईट" असं म्हणत पॉलिसीबाजारच्या जाहिरातीवर टीकेची झोड उठवण्यात आली. 

२३ फेब्रुवारी रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान प्रसारित झालेल्या या टीव्ही जाहिरातीत एक महिलेला तिच्या दिवंगत पतीने कुटुंबासाठी टर्म लाइफ इन्शुरन्स खरेदी न केल्यामुळे निराश झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. जाहिरातीत ती "मी शाळेची फी कशी भरू? घराचा खर्चही आहे. तुम्ही टर्म लाइफ इन्शुरन्स न घेताच निघून गेलात" असं म्हणताना दिसत आहे. जाहिरातीत तिच्या पतीचा मृत्यू झाला असून त्याच्या फोटोला हार घातलेला दिसत आहे. 

जाहिरातीतील संदेश हा कुटुंबांसाठी आर्थिक सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी होता. मात्र तर अनेक सोशल मीडिया युजर्सनी या जाहिरातीबद्दल तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. "एका पुरुषाचं नुकतंच निधन झालं आणि त्याची पत्नी पहिली गोष्ट काय करते तर टर्म इन्शुरन्स न घेतल्याबद्दल त्याला दोष देते? ही आर्थिक जागरूकता नाही, हे फक्त असंवेदनशील कथानक आहे" असं एका एक्स युजरने म्हटलं आहे. 

एका युजरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. "ही जाहिरात केवळ असंवेदनशीलच नाही तर संतापजनक देखील आहे. पॉलिसीबाजार आता तरी थोडे मोठे व्हा. ही जाहिरात  काढा आणि एखादी चांगली जाहिरात लाँच करा." आणखी एका युजरने "पुरुषांचा आणि मानवतेचा अपमान. रणवीर अलाहबादियापेक्षाही अत्यंत वाईट" असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. लाखो लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओ