Shahrukh Khan Limousine: शाहरुखच्या 'रॉयल' कारमधून फक्त नरेंद्र मोदींना प्रवासाची परवानगी होती हे तुम्हाला माहित्येय का? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 04:52 PM2021-10-20T16:52:53+5:302021-10-20T16:55:19+5:30

बॉलीवूडचा किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या अभिनेता शाहरुख खाननं २०१४ साली दुबईतील एका इव्हेंटमध्ये केलेली 'रॉयल' एन्ट्रीची जगभरात चर्चा झाली होती.

Did you know that only Narendra Modi was allowed to travel in Shah Rukh's 'Royal' car? Read ... | Shahrukh Khan Limousine: शाहरुखच्या 'रॉयल' कारमधून फक्त नरेंद्र मोदींना प्रवासाची परवानगी होती हे तुम्हाला माहित्येय का? वाचा...

Shahrukh Khan Limousine: शाहरुखच्या 'रॉयल' कारमधून फक्त नरेंद्र मोदींना प्रवासाची परवानगी होती हे तुम्हाला माहित्येय का? वाचा...

Next

बॉलीवूडचा किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या अभिनेता शाहरुख खाननं (Shahrukh Khan) २०१४ साली दुबईतील एका इव्हेंटमध्ये केलेली 'रॉयल' एन्ट्रीची जगभरात चर्चा झाली होती. शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी त्यावेळी दुबईत एका इव्हेंटमध्ये चक्क १०० मीटर लांब अशा 'रॉयल' कारमधून पोहोचले होते. शाहरुखच्या या रॉयल कारची (Limousine Car) प्रचंड चर्चा रंगली होती. 

दुबईत शाहरुखनं 'रॉयल इस्टेट्स बाय शाहरुख खान' नावानं रिअल इस्टेट विश्वात पाऊल टाकलं होतं. या कार्यक्रमाला भारत, पाकिस्तान, कॅनडा आणि यूकेमधून हायप्रोफाइल व्यक्तींची उपस्थिती होती. याच वर्षात शाहरुख भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी ठरला होता. पण शाहरुख खान या इव्हेंटला ज्या रॉयल कारमधून पोहोचला होता. त्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एक खास कनेक्शन आहे हे तुम्हाला माहित्येय का?

२०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबईत कॉमनवेल्थ परिषदेसाठी गेलेले असताना देखील अशाच एका रॉयल कारमधून कार्यक्रम स्थली पोहोचले होते. ती कार दुसरी तिसरी कुणाची नसून शाहरुख खान याचीच होती. समोर आलेल्या माहितीनुसार केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच या कारमधून प्रवासाची त्यावेळी खास परवानगी देण्यात आली होती.  कॉमनवेल्थ परिषदेत त्यावेळी जगभरातील एकूण ५२ देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची या बैठकीसाठीची एन्ट्री एकदम खास आणि रॉयल ठरली होती. 

Web Title: Did you know that only Narendra Modi was allowed to travel in Shah Rukh's 'Royal' car? Read ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.