कोरोना व्हॅक्सीन मिळवण्यासाठी याने पार केली हद्द, बनला स्पायडरमॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 15:36 IST2021-08-15T15:18:01+5:302021-08-15T15:36:54+5:30
एका अशा व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल (Vaccination Viral Video) होत आहे ज्यानं लस मिळवण्यासाठी असं काही केलंय की ते पाहुन तुम्हालाही धक्का बसेल...

कोरोना व्हॅक्सीन मिळवण्यासाठी याने पार केली हद्द, बनला स्पायडरमॅन
देशभरात कोरोनाचा (Coronavirus in India) प्रसार रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनापासून बचावासाठी लस (Corona Vaccine) घेणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, कोरोनाची लस मिळणं तितकं सोपं नाही. लस मिळवण्यासाठी काही लोक पैसे देत आहेत तर अनेकजण तर तासंतास रांगेत उभा राहून लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच सध्या एका अशा व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल (Vaccination Viral Video) होत आहे ज्यानं लस मिळवण्यासाठी असं काही केलंय की ते पाहुन तुम्हालाही धक्का बसेल...
इस जोश को सैल्यूट रहेगा😂😂😂😂 pic.twitter.com/h40FWE9dPv
— पनौति (@panauti96) August 14, 2021
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती दोन भींतीच्या मध्ये उभी आहे. ती खिडकीत डोकावते. त्यानंतर त्याला लस दिली जाते. बाहेर अनेक लोक रांगेत लाटकळत उभे आहेत. रांगेत उभे न राहता लस मिळवण्यासाठी या व्यक्तीने हा जुगाड केलेला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ बिहारमधील असल्याचा दावा केला जात आहे.
On( ऊपर ) line (लाइन में लगना )=online
— vipin kumar (@vipinku55025219) August 13, 2021
When your gf is nurse and you get some special privilege🥲😇🙂
— Aman (@aman__79) August 13, 2021
या व्हिडिओवर नेटीझन्सनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कोणी म्हणतंय याला म्हणतात 'ऑन' 'लाईन' टीकाकरण. तरं दुसरा एकजण म्हणतोय की काकांची गर्लफ्रेंड नर्स असेल. अनेकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत या मजेशीर व्हिडिओचा आनंद घेतला आहे.