अचानक धावत आली गाय अन् काही कळायच्या आत दिली दुचाकीस्वाराला धडक, पुढे झाले हे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 03:29 PM2021-11-04T15:29:16+5:302021-11-04T16:15:25+5:30

असं म्हणतात सावध तो सुखी! पण समजा सावध व्हायला वेळच नाही मिळाला आणि अचानक एखादी दुर्घटना घडली तर? असंच काहीसं एका दुचाकीस्वारासोबत घडलंय. त्याच्या ध्यानीमनीपण नसेल की त्याने न केलेल्या चुकीची त्याला अशी शिक्षा मिळणार आहे.

cow hits the motorcycle in brazil video goes viral on social media | अचानक धावत आली गाय अन् काही कळायच्या आत दिली दुचाकीस्वाराला धडक, पुढे झाले हे हाल

अचानक धावत आली गाय अन् काही कळायच्या आत दिली दुचाकीस्वाराला धडक, पुढे झाले हे हाल

Next

असं म्हणतात सावध तो सुखी! पण समजा सावध व्हायला वेळच नाही मिळाला आणि अचानक एखादी दुर्घटना घडली तर? असंच काहीसं एका दुचाकीस्वारासोबत घडलंय. त्याच्या ध्यानीमनीपण नसेल की त्याने न केलेल्या चुकीची त्याला अशी शिक्षा मिळणार आहे.

ही घटना ब्राझिलमधील आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक गाय अचानक धावताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, ट्रॅफिक सिग्नलवर गाय सरळ धावत येते. रस्त्यावरुन वाहनं भरधाव वेगाने जात असतात. त्यानंतर भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला गाय आदळते. दुचाकीस्वाराला काही समजेल तोपर्यंत तो उडी मारून रस्त्यावर पडतो. त्यानंतर गाय तिथून निघून जाते.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला क्षणभर धक्का बसला असेल. कारण हे बाईक रायडरच्या जीवावर बेतलं असतं. दुचाकीस्वाराला कल्पनाही नव्हती की एक गाय त्याच्या दिशेने धावत येत आहे. अशा परिस्थितीत त्याला सावरण्याची संधीही मिळाली नाही. सुदैवाने गायीने मारल्यानंतर त्याला फारशी दुखापत झाली नाही.

व्हायरल हॉगने हा व्हिडिओ त्याच्या यूट्यूब अकाउंटवर शेअर केला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, त्यावेळी तो त्याच्या कारमध्ये एका मित्राची वाट पाहत होता. तेवढ्यात एक गाय धावत आली आणि थेट दुचाकीस्वाराला धडकली. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ ८३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

Web Title: cow hits the motorcycle in brazil video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.