उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग! ना बाराती ना शहनाई कार चालवत स्वत:च निघाली वराला न्यायला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 16:31 IST2021-10-25T16:31:12+5:302021-10-25T16:31:22+5:30
एका वधुची स्थिती उतवळ्या नवऱ्यासारखी झालीय आणि ती चक्क गुडघ्याला बाशिंग बांधुन निघालीय. अहो कुठे म्हणून काय विचारता? वधु चालली नवऱ्याला घ्यायला. तिना नको बाराती न वऱ्हाडी ती एकच बास आहे नवऱ्याला लग्नमंडपात घेऊन यायला...

उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग! ना बाराती ना शहनाई कार चालवत स्वत:च निघाली वराला न्यायला
लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत भावूक क्षण असतो. पण आता परिस्थीती बदलली आहे. आजकाल मुलींचा लग्नातील उत्साह वरालाही लाजवेल असा असतो. अशाच एका वधुची स्थिती उतवळ्या नवऱ्यासारखी झालीय आणि ती चक्क गुडघ्याला बाशिंग बांधुन निघालीय. अहो कुठे म्हणून काय विचारता? वधु चालली नवऱ्याला घ्यायला. तिना नको बाराती न वऱ्हाडी ती एकच बास आहे नवऱ्याला लग्नमंडपात घेऊन यायला...
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी कार चालवताना दिसत आहे. वधू गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. यासोबतच तिने तिच्या गळ्यात हार घातला आहे. तुम्ही पाहू शकता की, वधू किती उत्साही दिसत आहे. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्यही पाहण्यासारखे आहे.वधूचा हा गोंडस व्हिडिओ इंस्टाग्रामवर witty_wedding नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, मी वरला पिकअप करण्यासाठी बाहेर जात आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून हा व्हिडिओ २१ हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी वधूच्या स्वॅगला क्यूट म्हटले आहे, त्यामुळे अनेक युजर्स इमोटिकॉन्सद्वारे त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत. सध्या वधू वराचे असे व्हिडीओ सगळीकडे पाहायला मिळतात, आधी लग्नानंतर रडणाऱ्या मुली आता लग्नात वराच्याही वरचढ दिसतात.