अतिउत्साहात मारली पाण्यात उडी, समोेरुन बोट आली अन् जीवचं जाणार होता इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 02:16 PM2021-09-03T14:16:41+5:302021-09-03T15:34:04+5:30

अनेकदा आपण उत्साहाच्या भरात काही करायला जातो अन् होत्याचं नव्हतं होऊन बसतं. एका मुलाने असंच उत्साहाच्या भरात पाण्यात उडी मारली पण इतक्यात असं काही झालं की त्याचा जीव जाता जाता वाचला...

boy jumping in the sea boat passes see what happens next video goes viral | अतिउत्साहात मारली पाण्यात उडी, समोेरुन बोट आली अन् जीवचं जाणार होता इतक्यात...

अतिउत्साहात मारली पाण्यात उडी, समोेरुन बोट आली अन् जीवचं जाणार होता इतक्यात...

Next

अनेकदा आपण उत्साहाच्या भरात काही करायला जातो अन् होत्याचं नव्हतं होऊन बसतं. एका मुलाने असंच उत्साहाच्या भरात पाण्यात उडी मारली पण इतक्यात असं काही झालं की त्याचा जीव जाता जाता वाचला...

या व्हिडिओच्या सुरुवातीला दोन लहान मुले समुद्रावर उभारलेल्या पुलावर उभी असलेली दिसत आहेत. ही दोन्ही मुलं समुद्रात सूर मारायच्या बेतात आहेत. यापैकी एक मुलगा समुद्रात उडी मारतो. त्यापाठोपाठ दुसरा लहान मुलगाही समुद्रात सूर मारतो. अवघ्या काही सेकंदातच हा मुलगा किती मोठ्या अपघातामधून बचावला, हे आपल्या लक्षात येते. कारण या लहान मुलाने समुद्रात सूर मारल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये तिथून एक लहान बोट जाताना दिसते. या लहान मुलाने उडी मारायला आणखी उशीर केला असता तर बोटीवर आपटून त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती. मात्र, केवळ दैव बलवत्तर म्हणून हा मुलगा थोडक्यात अपघातामधून बचावला.

सोशल मीडियावर या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. meemlogy या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १० लाख लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे.

 

Web Title: boy jumping in the sea boat passes see what happens next video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.