"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 08:16 AM2024-06-02T08:16:46+5:302024-06-02T08:24:37+5:30

Lok Sabha Election 2024 Somnath Bharati And Narendra Modi : आम आदमी पार्टीचे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी मोठा दावा केला आहे.

Lok Sabha Election 2024 delhi aap candidate Somnath Bharati big statement over Narendra Modi third time pm | "मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"

"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"

एक्झिट पोलमध्ये NDA पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. याच दरम्यान आम आदमी पार्टीचे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी मोठा दावा केला आहे. "नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन. ४ जून रोजी सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील. दिल्लीतील सातही जागा इंडिया आघाडी जिंकेल" असं सोमनाथ यांनी म्हटलं आहे. 

सोमनाथ भारती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन. माझे हे शब्द लक्षात ठेवा. ४ जून रोजी सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील आणि मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत. दिल्लीतील सातही जागा इंडिया आघाडी जिंकेल. मोदीजींच्या भीतीमुळे एक्झिट पोल त्यांना पराभूत झाल्याचे दाखवू देत नाहीत. त्यामुळे आपल्या सर्वांना ४ जूनला निकालाची वाट पाहावी लागेल. जनतेने भाजपाच्या विरोधात प्रचंड मतदान केलं आहे" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

सोमनाथ भारती नवी दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या आणि भाजपा उमेदवार बांसुरी स्वराज यांच्याशी आहे. भाजपाने त्यांना पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात उतरवलं आहे.

यावेळी आम आदमी पार्टीने दिल्लीतील चार जागांवर निवडणूक लढवली, तर काँग्रेसने तीन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. पूर्व दिल्ली, नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्ली अशा ज्या जागांवर 'आप'ने निवडणूक लढवली. तर काँग्रेस चांदणी चौक, उत्तर पश्चिम दिल्ली आणि ईशान्य दिल्लीत निवडणूक लढवत आहे.
 

Web Title: Lok Sabha Election 2024 delhi aap candidate Somnath Bharati big statement over Narendra Modi third time pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.