हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video

Rohit Sharma Fan Video : भारतीय संघाने सराव सामन्यात बांगलादेशचा ६० धावांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 06:27 AM2024-06-02T06:27:30+5:302024-06-02T06:34:24+5:30

whatsapp join usJoin us
a fan who breached the field and hugged Rohit Sharma was taken down by the USA police in India vs Bangladesh Warm Up Match | हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video

हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh Warm Up Match : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे करोडो चाहते आहेत. रोहित मायदेशात असो की मग भारताबाहेर... त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. सध्या अमेरिकेत ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. शनिवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना खेळवला गेला. भारताने आपल्या एकमेव सराव सामन्यात बांगलादेशचा दारूण पराभव केला. पण, या सामन्यात एक नाट्यमय घडामोड घडली. रोहितचा जबरा फॅन लाईव्ह सामन्यात मैदानात शिरला आणि आपल्या आवडत्या खेळाडूला जाऊन भेटला. मात्र, स्थानिक पोलिसांनी चाहत्याला दाखवलेला इंगा पाहून भारतीय कर्णधार देखील अवाक् झाला.

प्रथम फलंदाजीत मग गोलंदाजीत कमाल करून टीम इंडियाने ६० धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद केवळ १२२ धावा करू शकला. भारतीय गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करून विजय साकारला.

सध्या सोशल मीडियावर रोहितच्या चाहत्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. चाहता मैदानात शिरल्याचे समजताच पोलिसांनी धाव घेतली. रोहितजवळ गेलेल्या चाहत्याला प्रथम एका पोलीस कर्मचाऱ्याने पकडले. मग त्याचा आणखी एक सहकारी तिथे पोहोचला. दोन्ही पोलिसांनी त्याला झडप घालून खाली लोळवले. हे पाहून रोहित शर्मा देखील स्तब्ध झाला. मग त्याने इशारा करत सर्व काही सांभाळून  करण्यास सांगितले. 

भारताचा मोठा विजय 

१८३ धावांचा बचाव करताना अर्शदीप सिंग (२), जसप्रीत बुमराह (१), मोहम्मद सिराज (१), हार्दिक पांड्या (१), अक्षर पटेल (१) आणि शिवम दुबे (२) अशी भारतीय गोलंदाजांची कामगिरी राहिली. बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी सराव म्हणून एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. कर्णधार रोहित शर्मा आणि संजू सॅमसनने डावाची सुरुवात केली. विराट कोहली नुकताच अमेरिकेत दाखल झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली. रिषभ पंतने अर्धशतकी खेळी करून विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. इतरही फलंदाजांचा सराव व्हावा या हेतूने पंतला निम्म्यातून तंबूत परतावे लागले. तो ३२ चेंडूत ५३ धावा करून नाबाद परतला.

Web Title: a fan who breached the field and hugged Rohit Sharma was taken down by the USA police in India vs Bangladesh Warm Up Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.