Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 06:58 AM2024-06-02T06:58:27+5:302024-06-02T07:13:37+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope 2 june 2024 know what your rashi says rashi bhavishya | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता

मेष

 

रविवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या याकडे होईल. द्विधा मनामुळे ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. शक्यतो आज आर्थिक देवाण - घेवाण करू नका... आणखी वाचा

वृषभ

रविवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ व सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल... आणखी वाचा

मिथुन

 रविवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. वरिष्ठ प्रोत्साहन देतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल... आणखी वाचा

कर्क

रविवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास ह्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल... आणखी वाचा

सिंह

रविवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आज आपला संताप वाढल्याने आपले मन अशांत होईल... आणखी वाचा

कन्या

 रविवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल. उंची वस्त्रे व अलंकाराची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल... आणखी वाचा

तूळ

 रविवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. घरातील सुखा - समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कामात यश प्राप्ती होईल... आणखी वाचा

वृश्चिक

रविवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आज शक्यतो प्रवासाचे आयोजन करू नये. आरोग्य विषयक चिंता निर्माण होईल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल... आणखी वाचा

धनु

विवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आज जास्त संवेदनशीलतेमुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने पण दिवस चांगाल नाही... आणखी वाचा

मकर

रविवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आज आपण शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहावे लागेल. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. शेअर - सट्ट्यातील गुंतवणूक लाभ देईल... आणखी वाचा

कुंभ

रविवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणताही ठोस निर्णय आपण घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबियांशी मतभेद होतील... आणखी वाचा

मीन

रविवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आजचा दिवस आनंद व उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. नातलग, संबंधित व मित्र यांच्याशी भेट - संवाद घडतील... आणखी वाचा

 

Web Title: Today Daily Horoscope 2 june 2024 know what your rashi says rashi bhavishya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app