आरंर! स्टंट करायला गेले अन् बाईकच थेट घरात घुसवली, हा 8 सेकंदाचा व्हिडिओ पाहुन दिवस भारी जाईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 14:03 IST2021-08-30T12:10:26+5:302021-08-30T14:03:33+5:30
व्हायरल होत असलेला व्हिडीओ फक्त आठ सेकंदांचा आहे. आठ सेकंदांचा असला तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवरने तो शेअर केलाय.

आरंर! स्टंट करायला गेले अन् बाईकच थेट घरात घुसवली, हा 8 सेकंदाचा व्हिडिओ पाहुन दिवस भारी जाईल
कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवरला त्याच्या कॉमेडीमुळे प्रसिद्ध आहेच पण तो सोशल मीडियावरही सक्रिय असतो. सध्या त्याने एक अतिशय मजेदार व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ फक्त आठ सेकंदांचा आहे. आठ सेकंदांचा असला तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
व्हिडीओमध्ये दिसत असलेले दुचाकीस्वार अतिशय वेगात दुचाकी चालवत आहेत. दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना काय करावे समजत नाहीये. शेवटी नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी थेट समोरच्या घरात शिरली आहे. घराला दरवाजा नसल्यामुळे ही दुचाकी थेट घरात शिरलीय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. ‘मेरा पिया घर आया’ असं सुनिलने व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय.
लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरले नाही. तर काही लोकांनी दुचाकी हळू आणि जपून चालवायला हवी, असा सल्ला दिला आहे. कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवरने हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे त्याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे.