मुलगी झाली हो! घरी आली 'नन्ही परी'; 'त्यानं' आनंदात फ्रीमध्ये 50 हजार लोकांना वाटली 'पाणीपुरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 05:30 PM2021-09-14T17:30:53+5:302021-09-14T17:34:17+5:30

Anchal Gupta : लोकांना मोफत पाणीपुरी देण्यासाठी पाणीपुरीचे अनेक स्टॉल लावले होते.

bhopal anchal gupta serving free golgappas to people after birth of daughter | मुलगी झाली हो! घरी आली 'नन्ही परी'; 'त्यानं' आनंदात फ्रीमध्ये 50 हजार लोकांना वाटली 'पाणीपुरी'

मुलगी झाली हो! घरी आली 'नन्ही परी'; 'त्यानं' आनंदात फ्रीमध्ये 50 हजार लोकांना वाटली 'पाणीपुरी'

Next

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या भोपाळमधील एका कुटुंबाने मुलीच्या जन्माचा आनंद अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. घरी 'नन्ही परी' आल्याच्या आनंदात एका व्यक्तीने फ्रीमध्ये तब्बल 50 हजार लोकांना 'पाणी पुरी' वाटल्याची घटना समोर आली आहे. एका पाणीपुरी विक्रेत्याने मुलींना एक ओझं समजणाऱ्यांना मोठा संदेश दिला आहे. कोलर परिसरात राहणारे अंचल गुप्ता यांनी मुलगी झाली म्हणून दुपारी 1 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकानात आलेल्या सर्व ग्राहकांना मोफत पाणीपुरी दिली आहे. त्यांनी तब्बल 50 हजार लोकांना मोफत पाणीपुरी दिली.

कोलार परिसरात त्यांनी लोकांना मोफत पाणीपुरी देण्यासाठी पाणीपुरीचे अनेक स्टॉल लावले होते. अंचल गुप्ता यांनी मला मुलगी झाली आहे. मी देवाकडे प्रार्थना केली होती की माझ्या घरी मुलीचा जन्म व्हावा आणि देवाने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. मुलीच्या जन्माआधी मी म्हटलं होतं की, माझ्या घरी मुलगी झाली तर मी एक दिवस पाणीपुरीचा फ्री स्टॉल ठेवेन. आता माझ्या घरी मुलगी आली आहे. त्यामुळे हा मोफत स्टॉल ठेवला असून लोक हवं तेवढी पाणीपुरी खाऊ शकतात असं म्हटलं आहे. 

मुलीच्या जन्माचा अनोख्या पद्धतीने साजरा केला आनंद

मुलीच्या जन्माचा अनोख्या पद्धतीनं साजरा केलेला हा आनंद पाहून लोकही यात सहभागी झाले. तसेच यांचं भरभरून कौतुकही केलं जात आहे. मोफत पाणीपुरी मिळणाऱ्या या स्टॉलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोठ्या उत्साहात या कुटुंबाने मुलगी घरी येण्याचा आनंद साजरा केला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओच्या आधारे अनेक लोकांनी अंचल गुप्ता यांच्या मुलीला बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचं ब्रँड अँबेसडर करा अशी मागणी केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना देखील टॅग केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: bhopal anchal gupta serving free golgappas to people after birth of daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.