अस्वलाला कधी पोल डान्स करताना पाहिलंय का? मग पाहा हा व्हिडिओ, पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 12:44 PM2021-11-08T12:44:49+5:302021-11-08T12:49:45+5:30

एक अस्वलाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.या व्हिडीओला आतापर्यंत १६ लाख ६० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. अस्वल पोल डान्स कसा करू शकतो, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असेल, तर पाहा व्हिडिओ...

bear doing pole dance, video shocks netizens as it goes viral | अस्वलाला कधी पोल डान्स करताना पाहिलंय का? मग पाहा हा व्हिडिओ, पोट धरुन हसाल

अस्वलाला कधी पोल डान्स करताना पाहिलंय का? मग पाहा हा व्हिडिओ, पोट धरुन हसाल

Next

तुम्ही कधी अस्वलाला ‘पोल डान्स’ करताना पाहिले आहे का? एक अस्वलाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.या व्हिडीओला आतापर्यंत १६ लाख ६० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. अस्वल पोल डान्स कसा करू शकतो, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असेल, तर पाहा व्हिडिओ...

२५ ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ अर्थफोकस (earthfocus)नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. युजरच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ सर्वप्रथम TikToker jcruzalvarez26 ने शेअर केला होता. मात्र हा व्हिडीओ कुठचा आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ़

अस्वलाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल अस्वल ज्या पद्धतीने पोलवर आपली पाठ घासताना दिसत आहे. ते दृष्य पाहून तो पोल डान्स करत आहे असे वाटत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटले असेल.

अर्थ फोकसने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे. यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने त्यावर कमेंन्ट केली आहे की ‘अप्रतिम दृश्य, किती परफेक्ट क्लिक.’ त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘मी पहिल्यांदाच असा डान्स करणारा अस्वल पाहिला आहे.’

Web Title: bear doing pole dance, video shocks netizens as it goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.