VIDEO : लाहन मुलासारखे अस्वलाचे दात स्वच्छ करून देत आहे व्यक्ती आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 01:10 PM2024-01-05T13:10:26+5:302024-01-05T13:13:11+5:30

Viral Video : एक व्यक्ती भल्यामोठ्या अस्वलाचे दात स्वच्छ करून देत आहे. इतकंच नाही तर अस्वलाच्या तोंडात टाकून त्याच्या दातांना ब्रशने स्वच्छ करत आहे.

a video going viral of man brushing bear teeth in Russia | VIDEO : लाहन मुलासारखे अस्वलाचे दात स्वच्छ करून देत आहे व्यक्ती आणि मग...

VIDEO : लाहन मुलासारखे अस्वलाचे दात स्वच्छ करून देत आहे व्यक्ती आणि मग...

Viral Video : अस्वलाला जंगलातील सगळ्यात आळशी आणि शक्तीशाली प्राणी मानलं जातं. खासकरून ब्राउन बीयरला जंगलातील मोठमोठे प्राणीही घाबरतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती भल्यामोठ्या अस्वलाचे दात स्वच्छ करून देत आहे. इतकंच नाही तर अस्वलाच्या तोंडात टाकून त्याच्या दातांना ब्रशने स्वच्छ करत आहे.

X हॅंडल @AMAZlNGNATURE वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात एक वयस्क अस्वल आरामात बसलं आहे आणि गपचूप एका व्यक्तीकडून ब्रश करून घेत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, रशियात ही कॉमन गोष्ट आहे. अस्वलाचे दात स्वच्छ करणारी व्यक्ती प्रशिक्षित दिसत आहे.

आपण व्हिडिओत बघू शकता की, व्यक्ती आधी हातात ग्लासमध्ये पाणी आणि ब्रश घेऊन येतो. यानंतर तो अस्वलाच्या दातांची स्वच्छता करतो. खास बाब म्हणजे अस्वलही शांतपणे बसून त्याला दात स्वच्छ करू देत आहे. दोघांची चांगली गट्टी असल्याचंही दिसत आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 98 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिलं की, जे लोक आपल्या श्वानांचे ब्रश करत नाही, त्याना हा व्हिडीओ दाखवला पाहिजे. 

Web Title: a video going viral of man brushing bear teeth in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.