शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

कोंडये येथील महिला पुरात गेली वाहून !; जोरदार पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 2:58 PM

rain, kankvali, sindhdurug कणकवली तालुक्यात मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अचानक ओहोळाला पूर आल्याने कोंडये तेलीवाडी येथील मयुरी मंगेश तेली (वय ३५) ही महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली. रात्री उशिरा पर्यंत शोध घेवूनही ती सापडली नव्हती . दरम्यान, ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी परत राबवलेल्या शोध महिमेत तिचा मृतदेह वाहून गेलेल्या ठिकाणापासून सुमारे दोन किलोमीटरवर आढळून आला आहे

ठळक मुद्देकोंडये येथील महिला पुरात गेली वाहून !; जोरदार पावसाचा फटकाझाडीला अडकलेल्या स्थितीत मृतदेह आला आढळून

कणकवली : कणकवली तालुक्यात मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अचानक ओहोळाला पूर आल्याने कोंडये तेलीवाडी येथील मयुरी मंगेश तेली (वय ३५) ही महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली. रात्री उशिरा पर्यंत शोध घेवूनही ती सापडली नव्हती . दरम्यान, ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी परत राबवलेल्या शोध महिमेत तिचा मृतदेह वाहून गेलेल्या ठिकाणापासून सुमारे दोन किलोमीटरवर आढळून आला आहे.

सुदैवाने अक्षता(वय १४ )ही मयुरी तेली हीची मुलगी बचावली आहे. या घटनेची माहिती समजताच तहसीलदार आर.जे. पवार यांनी बुधवारी घटनास्थळी भेट दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, मयुरी तेली ही महिला आपल्या मुलीला सोबत घेवून गुरे चारण्यासाठी मंगळवारी गेली होती. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्या दोघी घरी परतत असताना मडयेचा व्हाळ करंजे व कोंडये या गावाच्या सीमेवर आल्या. यावेळी तेथील ओहोळ ओलांडत असताना अचानक पुराचे पाणी आल्याने त्या वाहून जावू लागल्या .

यावेळी अक्षता हिने आरडा ओरड केली.मात्र, पाण्याला वेग जास्त असल्यामुळे मयुरी तेली या वाहून गेल्या .सुदैवाने तिच्यासोबत असलेल्या अक्षताच्या हाताला झाडाची फांदी लागल्याने तीने ती घट्ट पकडून ठेवल्याने ती बचावली आहे. घाबरलेल्या अवस्थेत तिने आरडाओरडा करत आई पाण्यात वाहून गेली असे शेजारी व आपल्या घरी जाऊन सांगितले. मात्र, तोपर्यंत मयुरी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती.या घटनेची माहिती गावातील ग्रामस्थांना समजल्यावर त्यांनी रात्री उशिरा पर्यंत त्या ओहोळाच्या परिसरात मयुरी हिला शोधण्यासाठी मोहीम राबवली.मात्र, मुसळधार पावसामुळे शोध मोहिमेला यश आले नाही .त्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली. दरम्यान , बुधवारी सकाळी ७ वाजता पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली . यावेळी घटनास्थळापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर मयुरी हीचा मृतदेह ओहोळा लगत झाडीत अडकलेल्या स्थितीत आढळून आला .बुधवारी सकाळी तहसीलदार आर.जे. पवार , संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत , माजी सरपंच पत्रकार गणेश जेठे , महसूल विभागातील लिपिक महादेव बाबर , तलाठी मारुती सलाम , मंडळ अधिकारी नीलिमा प्रभूदेसाई , पोलीस उपनिरीक्षक बाबर,पोलीस हवालदार वंजारे यांनी घटनास्थळी भेट दिली. फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात मयुरी तेली हिचे शवविच्छेदन डॉ. सचिन जँगम व आशा सेविका सिमरन तांबे यांनी केले.घटनास्थळी पोलीस पाटील संदेश मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य उमेश मेस्त्री,सचिन परब, माजी तंटामुक्ती अध्यक्ष आनंद परब, रवींद्र तेली, दिलीप तेली, सिताराम आंबेरकर,दिलीप परब, किरण रेडकर, राजा डिचवलकर,महेंद्र डिचवलकर,संदीप रासम आदींनी मदत केली. मयुरी हीच्या पश्चात पती , मुलगी, सासू , दीर असा परिवार आहे . पोलिसांना या घटनेबाबत संजय रेडकर- तेली यांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला .

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली