शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंडशिप चेंदवण संघाला विजेतेपद

By admin | Updated: January 14, 2015 00:30 IST

वैभववाडी चषक क्रिकेट स्पर्धा : वेंगुर्लेच्या रोहित स्पोर्टला उपविजेतेपद

वैभववाडी : येथील दत्तकृपा प्रतिष्ठान आयोजित वैभववाडी चषक २०१५ चा फ्रेंडशिप चेंदवण संघ विजेता ठरला तर उपविजेत्या वेंगुर्लेच्या रोहित स्पोर्ट्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते विजेत्या चेंदवण संघाला रोख ३५ हजार ५५५ रुपये व वैभववाडी चषक देऊन सन्मानित करण्यात आले.माजी आमदार प्रमोद जठार पुरस्कृत दत्तकृपा प्रतिष्ठानने वैभववाडी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. पारितोषिक वितरण समारंभाला भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुका सरचिटणीस राजेंद्र राणे, संजय रावराणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सज्जन रावराणे, संजय लोके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर, उपाध्यक्ष जयेंद्र कोलते, राकेश कुडतरकर, सचिव संकेत माईणकर, खजिनदार अमेय पोरे, ज्येष्ठ नागरिक अण्णा माईणकर, शांताराम माईणकर, शिवराम माईणकर, तंटामुक्ती अध्यक्ष रणजित तावडे, संतोष माईणकर आदी उपस्थित होते.अंतिम सामन्याच्या नाणेफेकीचा कौल जिंकून रोहित स्पोटर््सने क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना फ्रेंडशिप चेंदवण संघाने ८ षटकात ६० धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित स्पोटर््सचा डाव ४५ वर संपुष्टात आला. स्पर्धेचा अंतिम सामना चुरशीचा न झाल्याने क्रीडारसिकांचा काहीसा हिरमोड झाला.उपविजेत्या रोहित स्पोटर््सला रोख २२ हजार २२२ व चषक देण्यात आला. याखेरीज मालिकावीर किरण परब, सामनावीर संजू फर्नांडिस, उत्कृष्ट फलंदाज गोपाळ बट्टा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जॉनी डिसूजा (सर्व फ्रेंडशिप चेंदवण), उत्कृष्ट गोलंदाज गणेश कुबल (रोहित स्पोटर््स वेंगुर्ला) यांना रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून सुहास चव्हाण, मनोज सुतार यांनी काम पाहिले तर समीर पांढरे, अशोक नाईक यांनी समालोचन केले. गुणलेखक म्हणून दत्तराज साटम, हेमंत माईणकर, आशिष गुरव, भाग्येश पेडणेकर यांनी कामगिरी पार पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समीर माईणकर, आकाश कानडे, दिलीप पाटील, नितेश पाटील, रोहन कुडतरकर, नवनाथ गुरव, अवधूत माईणकर, सागर माईणकर आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)विकासाची जबाबदारी माझी : जठारमी आता आमदार नसलो तरी पूर्वी पाठपुरावा केलेले सर्व प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि विकासाचे नवे प्रकल्प तालुक्यात आणण्यासाठी केंद्र आणि राज्यातील सत्ता उपयोगात आणू. सत्तापक्षात असल्यामुळे वैभववाडीच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी दत्तकृपा प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करून दिल्यास शासनाचा निधी मिळवून देऊ असे आश्वासन माजी आमदार प्रमोद जठार यांनी वैभववाडी चषकाच्या पारितोषिक वितरण समारंभात दिले.