शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील वायफळ पोस्टला चाप हवा

By admin | Updated: July 4, 2015 00:12 IST

तरुणाईने सामाजिक गांभीर्य जपावे : गैरवापर टाळावा; सोशल मीडियातून खूप काही शिकण्यासारखे

सिद्धेश आचरेकर -मालवण -वन्यजीव तंत्रज्ञानातील गतिमान क्रांती म्हणजे व्हॉटस्अ‍ॅप. सोशल मीडियातील एक अग्रेसर अ‍ॅप्स. लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सोप्या पद्धतीने हाताळता येणारे हे अ‍ॅप्स आता वायफळ गोष्टींना अधिक महत्त्व देत आहे. यात तरुणवर्ग अधिक भरकटत चालला आहे. सोशल मीडिया हे सर्वांपर्यंत पोहोचण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे. मात्र, त्याचा गैरवापर होऊन वायफळ पोस्टना अधिक प्राधान्य दिले जात आहे. तरुणांनी सामाजिक बांधीलकी जपत अश्लील अथवा वायफळ पोस्टबाजीला लगाम लावायला हवा. शक्य तेवढा गैरवापर टाळून आधुनिक विचारांच्या देवाण-घेवाणींसाठी वापर होणे गरजेचे आहे. आजच्या युगात सुशिक्षित पिढीकडून जगाला मोठ्या आशा आहेत. मात्र, युवा पिढी चंगळवादाच्या आहारी जात आहे. वायफळ शेरेबाजीला महत्त्व देण्यापेक्षा पुरोगामी विचारांच्या पोस्ट टाका. सेलिब्रेटी अथवा नेत्यांबद्दल भावनिक मजकूर शेअर करण्यापेक्षा त्यांच्या विचारांना प्रसिद्धी द्या. सोशल मीडियाचा योग्य वापर तरुणांनी करायचे ठरविले, तर सर्व काही शक्य आहे. सोशल मीडियातून खूप काही शिकण्यासारखे सोशल मीडियामुळे माणसामाणसांतील नात्यात दरी निर्माण होत आहे, अशी ओरड ऐकायला मिळते; पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून कितीतरी नाती जोडली गेली आहेत. याला काही अपवाद असतीलही; पण सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियाचा वापर करून सर्वांना भुरळ घातली. हे सर्वश्रूतच आहे. एकूणच नातेसंबंध व सामाजिक काम साध्य करण्यासाठी मानवी जीवनात सोशल मीडियातून खूप शिकण्यासारखे असतेही. विचारांची देवाणघेवाण मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा व्हॉटस्अ‍ॅपवर ग्रुप आहे. या ग्रुपवर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, चित्रपट, आदी विषयांवर आठवड्यातून एकदा चर्चा होते. ग्रुपमधील सदस्य सहभागी होऊन विचार व अभिप्राय मांडतात. यात मार्गदर्शकाची भूमिका प्रा. सुमेधा नाईक बजावतात. ‘ही चर्चा अमुची’ हा त्यांचा उपक्रम आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, जर समाजात अशाप्रकारे चर्चात्मक उपक्रम राबविल्यास नक्कीच नवे विचार वृद्धिंगत होऊ शकतात, एवढे मात्र नक्की.वायफळ पोस्टला लगाम हवाच आतापर्यंत विविध अभिनेते, अभिनेत्री तसेच राजकीय व राष्ट्रीय नेते यांच्याबद्दल सोशल मीडियातून खिल्ली उडविली जाते. यातून वाद उफाळतो. समाजात तेढ निर्माण होते. आलिया भट, आलोकनाथ, रजनीकांत, श्री-जान्हवी, शरद पवार, आदी सेलिब्रेटींची टेर खेचली जाते. अशांवर कायद्याचे लक्ष असतानासुद्धा त्यांचे विडंबन थांबता थांबत नाही. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील श्री-जान्हवीच्या अश्लील डायलॉगांनी, तर कहरच माजविला आहे.नेत्यांची अवहेलना टाळावीएखादा राष्ट्रीय नेता म्हटला की, सुरुवातीलाच येतो तो त्या नेत्याचा समाज. राष्ट्रीय नेत्यांवरील पोस्ट टाकून आतापर्यंत कितीतरी संघर्षात्मक लढाया झाल्या आहेत, असे समाजात अस्थिरता पसरविणाऱ्यांनी थोर महापुरुषांचे कार्य सर्वांना उलगडून सांगितले पाहिजे. केवळ नेत्यांचे फोटो टाकून कमेंट्स किंवा लाईक मिळविण्यापेक्षा त्यांचे समाजाप्रती असणाऱ्या बहुमूल्य विचारांची देवाण-घेवाण झाल्यास देशाच्या प्रगतीस नक्कीच हातभार लागू शकतो. थोर पुरुषांवर कित्येक पुस्तके आहेत. त्या पुस्तकांतून त्यांच्या विचारांचा संदेश सोशल मीडियातून जगासमोर आणावा.