Sindhudurg: ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा का नाही, नीलेश राणे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:24 IST2025-11-28T13:23:15+5:302025-11-28T13:24:11+5:30
मते विकत घेतली जाणार असतील तर सर्वसामान्य उमेदवारांनी काय करावे?

Sindhudurg: ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा का नाही, नीलेश राणे यांचा सवाल
मालवण : भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात सापडलेल्या रकमेबाबत अद्यापही एफआयआर का दाखल झाला नाही? अशी विचारणा आमदार नीलेश राणे यांनी निवडणूक अधिकारी आणि मालवण पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेऊन गुरुवारी केली.
मालवणच्या नगरपालिका निवडणुकीवर प्रशासनाचे लक्ष असावे, यंत्रणांनी दक्ष राहावे, येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात, अशा सूचना आमदार राणे यांनी केल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आल्यानंतरच मालवणमधील काही घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे आल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
मालवणच्या नगरपालिका निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी आपली प्रॉपर्टी विकली आहे. काहींनी घर, गाडी, पत्नीचे मंगळसूत्र विकून निवडणुकीचे फॉर्म भरले आहेत, हे सिंधुदुर्गचे कल्चर नाही आहे. मते विकत घेतली जाणार असतील तर सर्वसामान्य उमेदवारांनी काय करावे? पैसे वाटपाचे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली असल्याचे आमदार नीलेश राणे यांनी पत्रकारांना सांगितले.