शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीसमोर जेव्हा बिबटे उभे ठाकतात...

By admin | Updated: July 27, 2015 00:20 IST

आंबतखोलची घटना : शिकस्तीने वाचवला स्वारांनी आपला जीव

सावर्डे : आपल्या मित्रासमवेत घरी निघालेल्या तरुणांचा रस्त्यावर बसलेल्या बिबट्याने पाठलाग केला. मोटारसायकलस्वाराने प्रसंगावधान राखून आपला जीव वाचवण्यासाठी धूमस्टाईलने गाडी चालवत बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. ही घटना चिपळूण तालुक्यातील आंबतखोल रस्त्यावर नुकतीच घडली.आंबतखोल (गुजरवाडी) येथे राहणारा मनोज मोहन सालेकर (२९) हा चिपळूण येथे एका खासगी कंपनीत नोकरी करतो. नेहमीप्रमाणे आपली ड्युटी संपवून तो सायंकाळी ६ वाजता सावर्डेत आला होता. तेथे काही कामानिमित्त थांबला तेथील काम उरकून रात्री साडेआठच्या सुमारास तो सावर्ड्यातून त्याचा मित्र ओंकार विजय राणे (१९, आंबतखोल, गुजरवाडी) याला बरोबर घेऊन घरी निघाला. याच दरम्यान त्याची गाडी आंबतखोल येथील निर्जन ठिकाणी आली असता समोर दोन बिबटे रस्त्यातच बसलेले त्यांच्या निदर्शनास आले. हे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर त्यांनी आपली गाडी बिबट्याच्या बाजूने काढली खरी पण त्यातील एका बिबट्याने त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.बिबट्या आपला पाठलाग करत असल्याचे मागे बसलेल्या मनोजचा मित्र ओंकार राणे याच्या निदर्शनास आले. त्यांनी आपला मित्र मनोज याला याबाबतची सूचना केली. दोघांचीही पाचावर धारण बसली. दोघांनीही आरडाओरड करत प्रसंगावधान राखून आपला जीव वाचवण्यासाठी धुमस्टाईलने गाडी हाकली. मोठ्या बाका प्रसंगाला तोंड देऊन सुटकेचा नि:श्वास टाकला.घरी पोहोचताच घडल्या प्रकाराबाबत घरातील तसेच वाडीतील लोकांना याबाबत सर्व काही कथन केले. त्यांच्यावर आलेला बाका प्रसंग ऐकून आंबतखोल गावातील संपूर्ण ग्रामस्थ भयभीत झाले. ग्रामस्थांनी याबाबतची खबर वन अधिकाऱ्यांना दिली. खबर मिळताच सावर्डाचे वनपाल अधिकारी नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबरच घटनास्थळी धाव घेतली व ग्रामस्थांना रात्री या रस्त्यावरुन ये-जा करु नका, असा सल्ला दिला. (वार्ताहर)