शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन प्रकल्पाचे स्वागतच

By admin | Updated: January 13, 2015 00:12 IST

आरोंदा जेटीला विरोधच : आरोंदा ग्रामस्थांनी मांडली भूमिका

सावंतवाडी : आरोंदा बंदर प्रकल्प कोणी कितीही अट्टाहास केला, तरी होणार नाही. जर त्यांनी बंदर प्रकल्प रद्द करून पर्यटन प्रकल्प आणला, तर त्यांचे स्वागतच करू, अशी भूमिका आरोंदावासीयांनी मांडली. आम्हाला अजून किती गुन्ह्यात अडकवणार आहात, असा सवालही विश्वनाथ नाईक, मनोहर आरोंदेकर, प्रशांत तारी, गोविंद मोटे आदींनी केला.ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिक्षण सभापती गुरू पेडणेकर, अंकुश जाधव, कॉग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती प्रमोद सावंत, संदीप नेमळेकर, संदीप सुकी, संतोष गावस, दिलीप भालेकर उपस्थित होते.यावेळी आरोंदा ग्रामस्थ म्हणाले, गावातील प्रमुख मंडळी एकत्र असून हातावर मोजण्याइतकेच लोक या प्रकल्पाच्या बाजूने आहेत. गावात एकी असून ती कायम राहणार आहे. माजी आमदार प्रमोद जठार हा प्रकल्प समन्वयातून सुरू करू असे म्हणतात. पण आम्हाला जेटी प्रकल्प नकोच आहे. त्यामुळे समन्वयाचा प्रश्नच नाही. जर तेली जेटी प्रकल्प रद्द करून पर्यटन प्रकल्प आणत असतील, तर त्यांचे स्वागतच करू, अशी भूमिकाही यावेळी ग्रामस्थांनी मांडली. आरोंदा येथे पोलिसांनी लाठीमार केला. तेली समर्थकांनी दगडफेकही केली. मग आमच्यावर तक्रारी का दाखल केल्या. त्यामुळे पोलीस अजून किती गुन्हे दाखल करणार आहेत, असा सवालही ग्रामस्थांनी केला. जेटीला विरोध आमचा कायम राहणार असून, जेटीच्या विरोधात कोणी मदत करत असेल, तर त्यांची मदतही घेऊ. पण जेटी होऊ देणार नाही, असे यावेळी ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले. नारायण राणे यांनी जी मदत केली, ती आम्ही कधीच विसरणार नाही. त्यांचे गावात सर्वत्र कौतुक होत असून राणे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)२८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईसावंतवाडी : आरोंदा येथे बंदर कंपनी विरोधात केलेल्या आंदोलनावेळी झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी कंपनी समर्थक व विरोधक अशा २८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यात कंपनी समर्थकांत १० जण, तर विरोधकांमधील १८ जणांवर ही कारवाई केली आहे. सोमवारी ५ जानेवारी रोजी आरोंदा येथे स्थायी समितीचे पदाधिकारी बंदराची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्या सोबत ग्रामस्थ होते. बंदराची पाहणी करून येत असतानाच जेटी कंपनीचे समर्थक आपल्या जागेत उभे असल्याचे पाहून विरोधात ग्रामस्थांनी घोषणा दिल्या. त्यातून दगडफेक झाली. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारींवरून २८ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.या सर्वांवर सावंतवाडी पोलिसांनी पुन्हा प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कंपनीचे संचालक माजी आमदार राजन तेली, समर्थक काका कुडाळकर, राजन आरोंदेकर, गोपाळ नाईक, ज्ञानदेव नाईक, संतोष खोबरेकर, श्रीकृष्ण खोबरेकर, संतोष नाईक, राजेश पेडणेकर, सिध्देश नाईक यांचा यामध्ये समावेश होता. कंपनी विरोधात जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परूळेकर, तालुकाध्यक्ष संजू परब, चंद्रकात गावडे, संदीप कुडतरकर, सभापती अंकुश जाधव, गुरू पेडणेकर, राजेश नाईक, विद्याधर नाईक, मंदार नार्वेकर, मनोहर आरोंदेकर, गजानन कुबल, दिगंबर नाईक, प्रशांत नाईक, प्रशांत तारी, सुधाकर नाईक, दिगंबर मोटे यांचा समावेश आहे. या सर्वांना सावंतवाडी तहसीलदारांसमोर हजर करण्यात येणार आहे. प्रमोद जठारांची भूमिका फसवीच : उपरकरकणकवली : सत्तेत गेल्यानंतर व राजन तेली यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आरोंदा जेटीबाबत माजी आमदार प्रमोद जठार यांची भूमिका बदलली आहे. ही शुद्ध फसवणूक असून हे जनता कधीही सहन करणार नाही, अशी टीका मनसेचे कोकण विभागीय संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, आरोंदा जेटीचा प्रश्न तापत असताना सत्ताधारी पक्षाच्या दोन विविध भूमिका समोर आल्या आहेत. लाठीहल्ला झाल्यावर पालकमंत्री आरोंदा येथील ग्रामस्थांना भेटले नाहीत. मात्र खासदार विनायक राऊत गेले आणि हा जेटी प्रकल्प सत्ता असली तरी रद्द करू शकत नाही. न्यायालयात जावे लागेल, असे सांगितले. सत्तेत असून युतीचे खासदार अशी वक्तव्ये करीत आहेत. जठारांनी जेटीचा प्रश्न सामंजस्याने सोडविला जाईल, असे सांगून जेटीला पाठींबाच दिला आहे. आम्ही जेटीला विरोध करताना व्यक्तीद्वेषातून केला नाही. साडेतीनशे मच्छिमार यामुळे उद्ध्वस्त होणार असल्यामुळेच हा विरोध केला. आमदार असताना त्यांनी एकदातरी माहिती घेतली का? सामंजस्याने हा प्रश्न सुटणार असता तर मच्छिमारांवर लाठी खाण्याची वेळ का आली. जेटीमुळे एका-दोघांचे पोट भरणार असून अनेकजण उद्ध्वस्त होतील, हे जठारांनी लक्षात घ्यावे, असे उपरकर म्हणाले. (वार्ताहर) ...मग मायनिंगचेही समर्थन करणार काय ?जेटीबाबत भूमिका बदलणाऱ्या प्रमोद जठार यांनी आतापर्यंत मायनिंगविरोधात भूमिका घेतली होती. आगामी काळात मायनिंग करणारे भाजपात आले तर त्यांचे समर्थन करणार का? हे प्रथम जाहीर करावे, असेही उपरकर म्हणाले.