शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार देणाऱ्या प्रकल्पांची वानवाच

By admin | Updated: November 10, 2014 23:53 IST

नव्या सरकारकडून अपेक्षा : महत्वाकांक्षी योजना निधीअभावी अद्याप दूरच--कणकवली तालुका

मिलिंद पारकर - कणकवली -तालुक्यात रस्ते, वीज, पाणी या शिवाय विकासाची कामे होऊ शकतात. मुलभूत समस्या सोडवण्यात कमी पडत असताना लोकांना आर्थिक समृद्धी मिळावी प्रकल्पाचा विचार करणे दुरापास्त आहे. तालुक्यात थेट रोजगार देणाऱ्या प्रकल्पांची वानवा आहेच. त्याशिवाय धरण प्रकल्प रखडल्याने आनुषंगिक समृदधीची दारेही उघडलेली नाहीत. शासकीय दूध योजनेसारखे प्र्रकल्प बंद झाल्यात जमा आहेत. शहरात भुयारी गटार योजनेसारख्या महत्त्वाकांक्षी योजना निधीअभावी अद्याप दूर आहेत. नव्या राज्य सरकारमध्ये जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या विनोद तावडे यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेशी युती झाल्यास आणखी एक मंत्रीपद जिल्ह्याला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढते आहे. साखर कारखाना होऊ घातला आहे. तालुक्यातील काही धरण प्रकल्प रखडले आहेत. या प्रकल्पांना निधी मिळून तातडीने हे प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी नव्या सरकारकडून प्रयत्न झाले पाहिजेत. सर्व धरणप्रकल्प पूर्ण झाल्यास येथील शेतकरी समृद्ध होऊ शकतो.फक्त निधी देऊन काही समस्या सुटत नाहीत. तर त्या विकासकामांच्या दर्जासाठी नियंत्रण ठेवणे हे नव्या सरकारकडून अपेक्षित आहे. प्रत्येक कामातील भ्रष्टाचाराची साखळी या कामांचा दर्जा घसरवते यावर नव्या सरकारकडून काय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. यातील एक म्हणजे रस्त्यांची कामे. तालुक्यात ग्रामीण भागात अनेक रस्ते नादुरूस्त झाले आहेत. या रस्त्यांसाठी निधी देणे आवश्यक आहे. तालुक्यातील सर्वसामान्य रूग्णांसाठी उपजिल्हा रूग्णालय हे आशास्थान आहे. अशावेळी हे रूग्णालय तज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि सुविधांनी सुसज्ज करणे सर्वांत महत्त्वाचे आहे. आतापर्यंत चार तालुक्यातील रूग्ण येणाऱ्या या शासकीय रूग्णालयात कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टरांची कायमच वानवा भासत आहे. सर्वसामान्यांना त्यामुळे ओरोस, गोवा बांबुळी अथवा खाजगी रूग्णालयांकडे धाव घ्यावी लागते. उपजिल्हा रूग्णालय सुसज्ज झाल्यास तालुक्यातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात थेट रोजगार देऊ शकेल असा उद्योग तालुक्यात अद्याप उभा राहू शकला नाही. तोंडवली येथे येऊ घातलेला स्टील प्रोजेक्ट किंवा शिडवणे येथे होऊ घातलेला साखर कारखाना, कासार्डे येथे नियोजित एमआयडीसी हे प्रकल्प अद्याप प्रत्यक्षात आलेले नाहीत. उद्योग उभारताना राजकारण टाळून त्यामध्ये पारदर्शकता ठेवण्याचे धोरण नव्या सरकारला ठेवावे लागेल. तर स्थानिकांचा विरोध टाळण्यात यश मिळेल. कासार्डे येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसी प्रकल्पातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. त्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. कणकवली शहरातील भुयारी गटार योजनेसाठी सुधारित आराखडा पाठविण्यात आला आहे. या योजनेला निधी मंजूर झाल्यास शहरातील सांडपाण्याची समस्या मार्गी लागू शकेल. हळवल ओव्हरब्रिजचे काम रखडले असल्याने हळवल पुढील काही गावांतील लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीमुळे निधी अभावी हे काम रखडले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आवश्यकता आहे.पर्यटनस्थळांसाठी कृती आवश्यककणकवली शहरात सुसज्ज क्रीडांगण नसल्याने होतकरू युवकांना, मुलांमधील अंगभूत गुणांना वाव मिळत नाही. शहरातील मुडेश्वर मैदानावर क्रीडा संकुल उभारण्याच्या घोषणा आतापर्यंत अनेकदा झाल्या.गोपुरीला उर्जितावस्थेची गरजपू.आप्पासाहेब पटवर्धन यांनी उभारलेला गोपुरी आश्रम हा कणकवली तालुक्याचा ठेवा असून तो दुर्लक्षित राहिला आहे. निधीअभावी आश्रमातील अनेक उपक्रम बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत.आश्रमाला उर्जितावस्था दिल्यास संस्कार, कृषी विकास, श्रमशक्ती, पर्यावरण संवर्धन, ग्रामस्तरावरील स्वयंपूर्णतेचे धडे दिले जाऊ शकतील.