शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अद्ययावत हॉस्पिटल उभारणार

By admin | Updated: August 24, 2015 23:21 IST

वेंगुर्लेवासीयांचा निर्धार : डॉ. कोटणीस स्मृती समितीच्या मुंबईतील बैठकीत निर्णय

वेंगुर्ले : वेंगुर्ले परिसरात राष्ट्रीय पातळीवरचे अद्ययावत हॉस्पिटल व्हावे असा निर्धार मुंबई येथे झालेल्या वेंगुर्लेवासीयांच्या बैठकीत करण्यात आला. डॉ. कोटणीस स्मृती समितीतर्फे कित्ते भंडारी हॉल, मुंबई येथे शनिवार झालेल्या या सभेस विविध क्षेत्रामधील २४२ मान्यवर उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक रघुवीर मंत्री होते. प्रास्ताविकात अतुल हुले यांनी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वेंगुर्ले येथे हॉस्पिटल उभारण्यासंबंधी गेल्या १५ वर्षांत केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी वेंगुर्ले येथे डॉ. कोटणीस यांच्या स्मरणार्थ हॉस्पिटल उभारण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे, तर केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार वेंगुर्ले येथील बंद असलेल्या सेंट लुक्स हॉस्पिटलच्या जागी एम्सच्या धर्तीवर अद्ययावत वैद्यकीय उपचार केंद्र व संशोधन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर केल्याची माहिती दिली. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत वेंगुर्ले नगरपरिषदेने योग केंद्र व हर्बल गार्डन उभारण्याचा निर्णय घेतला असून या उपक्रमात आरोग्यसेवेचा समावेश असल्याची माहिती हुले यांनी दिली. प्रा. सतीश चिंदरकर यांनी या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मोठा निधी उभारण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे जाहीर केले. आयुष विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर जुवेकर यांनी के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीची माहिती देऊन वेंगुर्ले येथे स्वत: येऊन रुग्णांना अल्प खर्चात उत्तम आरोग्यसेवा मिळाव्यात यादृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत. निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. माधुरी पवार यांनी औषधी वनस्पती व निसर्गोपचार पद्धतीची माहिती देऊन बंगलोर येथे उभारलेल्या राष्ट्रीय हर्बल गार्डनची माहिती दिली. तशाच प्रकारचे हर्बल गार्डन वेंगुर्ले येथे उभारण्याची सूचना केली व यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले. या सभेस प. म. राऊत गुरुजी, राम गावडे, अजित रेगे, बापूसाहेब तेरेखोलकर, डॉ. राजू रेडकर, मोहन नाईक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद तुळसकर यांनी केले. बँक भरतीसंदर्भात जिल्ह्यात मार्गदर्शन केंद्रे तसेच औषधी वनस्पतीस योग्य भाव मिळावा यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे तुळसकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)