शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:44 IST

Farmer Collcator Sindhudurgnews- जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारांमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात एकूण १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्राचे १८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती कोरडवाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली.

ठळक मुद्देअवकाळी पावसाने १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्र बाधित जानेवारी, फेब्रुवारीमध्ये झाला होता पाऊस, अहवाल शासनास सादर

सिंधुदुर्ग : जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारांमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात एकूण १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्राचे १८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती कोरडवाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली.गेल्या काही वर्षांपासून वातावरणात कमालीचे बदल जाणवू लागले आहेत. याचा परिमाण शेतकरी व बागायतदार यांना बसत आहे. हिवाळ्यातही पाऊस तसेच गारा पडून शेती व फळपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अनेक शेतकरी बाधित होत आहेत. जनावरांसोबतच निसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासनाकडून मिळत असलेली मदतही तुटपुंज्या स्वरूपाची आहे.जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये ऐन थंडीच्या दिवसात मुसळधार पाऊस व गारा पडल्या होत्या. जिरायती, बागायत व फळपिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील ४ शेतकऱ्यांचे ७७ गुंठे, कणकवली तालुक्यात २ शेतकऱ्यांचे २ गुंठे, असे एकूण ६ हजारांचे नुकसान झाले होते. बागायत पिकांमध्ये केळीचे पाच गुंठ्यावरील नुकसान झाले होते.फळपिकांमध्ये आंबा, काजू या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. यात सावंतवाडी ८ शेतकऱ्यांचे २१ गुंठ्याचे ४ हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे. वैभववाडी तालुक्यात ५६ हेक्टर क्षेत्रातील १०३ शेतकऱ्यांचे १० लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात ४४ हेक्टर क्षेत्राचे ७६ शेतकऱ्यांचे ८ लाख रुपये एवढे नुकसान झाले आहे; तर देवगड, कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यात फळपिकांचे नुकसान झाले नाही.नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्षपाऊस झाल्यानंतर जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तात्काळ कृषी सहायक यांच्या माध्यमातून ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या जिरायती, बागायती व फळपिकांचा अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालावर जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. आता नुकसानभरपाईकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग