शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: खैरतोड करणारे दोघे वनविभागाच्या ताब्यात, डेगवे येथील जंगलात कारवाई 

By अनंत खं.जाधव | Updated: August 9, 2024 16:19 IST

सावंतवाडी : डेगवे येथील शासकीय जंगलात खैरतोड केल्याप्रकरणी तळवडे येथील महेश मोहन मालवणकर (वय २८) व दौलत अशोक गोडकर ...

सावंतवाडी : डेगवे येथील शासकीय जंगलात खैरतोड केल्याप्रकरणी तळवडे येथील महेश मोहन मालवणकर (वय २८) व दौलत अशोक गोडकर (२०, दोघे रा. तळवडे) या दोघा युवकांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई ग्रामस्थांच्या मदतीने काल, गुरूवारी रात्रीच्या सुमारास सावंतवाडीवनविभागाने केली. यावेळी कटर मशीन, बॅटरी, दुचाकी आणि तोडलेले लाकुड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डेगवे-तांबोळी रस्त्यावरील शासकीय जंगलात रात्रीच्या वेळी खैर झाडे तोडण्यात येत असल्याचा आवाज तेथील स्थानिक ग्रामस्थ शंकर देसाई यांना आला. यावेळी त्यांनी गावातील अन्य ग्रामस्थांना व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. यावेळी सर्वांनी त्या ठिकाणी जावून त्या दोघांना मुद्देमालासह सह ताब्यात घेत त्याना धरून ठेवले.त्यानंतर वनविभागाचे पथक तेथे दाखल झाले आणि या युवकाना ताब्यात घेण्यात आले तसेच सावंतवाडी वनविभाच्याा माध्यमातून ग्रामस्थांकडून जी जागरुकता दाखवली त्याबद्दल आभार मानून बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी डेगवे सरपंच राजन देसाई, माजी सरपंच मधुकर देसाई, पोलिस पाटील अरविंद देसाई, राजेश देसाई, अजिंक्य घोडके आदी उपस्थित होते. ही कारवाई सिंधुदुर्ग चे उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनपाल प्रमोद सावंत, पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक संतोष मोरे, दत्तात्रय शिंदे, अप्पासो राठोड, सागर भोजने, संग्राम पाटील आदींनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभागSawantwadiसावंतवाडी