कणकवली : दादर येथून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही गाडी कणकवलीरेल्वे स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तुतारी एक्स्प्रेस कणकवली स्थानकात दाखल झाली. मात्र, रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याने गाडी कणकवली स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर दोन वर थांबवून ठेवण्यात आली. मोटारमनने दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. अखेर मडगाव येथून रेल्वेचे दुसरे इंजिन मागविण्यात आले असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली. हे रेल्वे इंजिन दाखल झाल्यानंतर तुतारी एक्स्प्रेस सावंतवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाली. मात्र, तोपर्यंत तुतारीमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, दुपारी पावणेदोनच्या सुमारास मडगावच्या दिशेने जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस कणकवली स्थानकात दाखल झाली, त्यावेळी काही प्रवाशांनी जनशताब्दीने पुढे जाणे पसंत केले.
Sindhudurg: तुतारी एक्स्प्रेसची इंजिन समस्या; दुसरे इंजिन आले मडगावाहून; प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:38 IST