शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळ किनारी हजारो मृत मासे

By admin | Updated: July 28, 2015 00:29 IST

प्रदूषणाचा कहर : विविध जातीचे मासे मेल्याने मच्छीमार संकटात

'दापोली : लोटे औद्योगिक वसाहतीचे रसायनमिश्रीत दूषित पाणी दाभोळ खाडीत वारंवार सोडण्यात येते. त्यामुळे दाभोळ खाडीतील लाखो मासे दरवर्षी मृत्यू पावत असून, रविवारी सायंकाळीही या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच आढळून आला. दरवर्षी पावसाळ्यात लोटे एमआयडीसीचे रसायनमिश्रीत दूषित पाणी सोडण्यात येऊ लागल्याने दाभोळ खाडीतील मच्छी व्यवसाय धोक्यात आला आहे. यावर्षी एकाच महिन्यात दोनदा मृत मासे किनाऱ्यावर आढळण्याचा प्रकार घडला आहे.दाभोळ खाडीवर पारंपरिक उपजीविका करणारा मच्छीमारी व्यवसाय संकटात सापडला असून, दाभोळ खाडीवर सुमारे ४० ते ५० गावातील मच्छीमार बांधव उपजीविका करतात. दाभोळ खाडीवर मासेमारी करुन पारंपरिक पद्धतीने अनेक पिढ्या हा समाज जीवन जगत होता. रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून लोटे येथील माळावर औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली. परंतु या व्यवसायामुळे दाभोळ खाडीला शाप लागला आहे. रविवारीही अशाच प्रकारे दाभोळ किनारी हजारो मासे मृतावस्थेत आढळले. त्यामध्ये मोठ्या माशांचाही समावेश होता.कोळथरे समुद्रकिनाऱ्यावर गेल्या १५ दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर विविध जातीच्या माशांचा खच पडला होता. त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्गंधी पसरली होती. १५ दिवसांनी पुन्हा मच्छीचा खच समुद्रकिनाऱ्यावर लागल्याने स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)माशांच्या प्रजनन कालावधीतच रसायनमिश्रीत दूषित पाणी सोडून लाखो मासे मारण्यात येत आहेत. परंतु प्रदूषण नियामक मंडळ करतेय काय, असा सवाल उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. मासे मृत पावल्यानंतर प्रदूषण नियामक मंडळाचे लोक येतात. नमुने घेऊन जातात. गेली कित्येक वर्षे हे असेच सुरु आहे. परंतु हे मासे कशामुळे मरतात, याचा पत्ता अजूनही लागलेला नाही.- माधव महाजन, ग्रामस्थ.