शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पाणी अडवून हिवाळी शेती करा : अण्णा हजारे

By admin | Updated: January 2, 2015 00:07 IST

कोरडवाहू शेती अभियानासाठी देवडे गावातील सुमारे ५० शेतकऱ्यांनी राळेगणसिद्धी गावाचा अभ्यास दौरा केला

मार्लेश्वर : कोकणात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून त्याचे योग्य नियोजन केले तर त्याचा आधुनिक शेतीसाठी वापर करता येणे शक्य आहे, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावच्या शेतकऱ्यांना दिला. कोरडवाहू शेती अभियानासाठी देवडे गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत गावातील सुमारे ५० शेतकऱ्यांनी नुकताच राळेगणसिद्धी गावाचा अभ्यास दौरा केला. या दौऱ्याच्या वेळी हजारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर दारुबंदी, हुंडाबंदी, वृक्षतोडबंदी, श्रमदान व चराई बंदीची पाच तत्वे सर्वांनी अंगिकारली पाहिजेत, असे अण्णांनी सांगितले. कोकणात दोन दिवस पडणारा पाऊस हा मराठवाड्यातील वर्षभरात पडणाऱ्या पावसाएवढा असतो. त्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसाचा सदुपयोग हिवाळी शेतीसाठी केला पाहिजे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी होते, असे हिवरे बाजाराचे सरपंच पोपट पवार यांनी सांगितले. देवडे गावातील शेतकऱ्यांनी दौऱ्याची सुरुवात फलटण येथील कृषी उद्यान केंद्र व भाजीपाला संशोधन केंद्राला भेट देऊन केली. यानंतर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रीन हाऊसमधील जरबेरा व कार्निशन या दुर्मीळ व शोभिवंत फुलांची पाहणी केली. त्यानंतर राळेगणसिद्धी गावाला भेट देऊन पाणलोटअंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली.या अभ्यास दौऱ्यात संगमेश्वर तालुका कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक दत्ताराम परब, सुनील जगदाळे, देवडे गावचे प्रगतशील शेतकरी बंधू बेर्डे, धोंडू लाड, सखाराम धुमक, सुभाष कांबळे, महेश धुमक, दीपक मांडवकर, सोमा तळेकर, सुरेश माईन, विजय वड्ये, जयवंत जाधव, दिलीप बेर्डे, अरुण कांबळे, विकास सुवरे, सुहास धुमक, संतोष मांडवकर, दिनेश बड्ये, चंद्रकांत बड्ये आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)