शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांची प्रेरणा घ्या

By admin | Updated: November 24, 2014 23:13 IST

वैभव नाईक : कुडाळ येथे आरपीआयच्यावतीने सत्कार समारंभ

कुडाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन शिक्षण क्षेत्रात क्रांती करा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ आरपीआयच्यावतीने केलेल्या सत्कार समारंभात केले. भारतीय संविधान हे माझ्या वाचनातला ठेवा असून संविधानाप्रमाणेच वाटचाल करून जनतेचा विकास करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. कुडाळ शहर आरपीआयच्यावतीने आमदार वैभव नाईक यांचा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष आत्माराम कुडाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, संजय भोगटे, आरपीआय शहर तालुकाध्यक्ष बाबुराव केळूसकर, महादेव कुडाळकर, रामचंद्र कुडाळकर, वसंत कु डाळकर, जगन्नाथ कुडाळकर, सुशीला कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांचा महादेव कुडाळकर, रामचंद्र कुडाळकर, वसंत कुडाळकर या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भारतीय संविधान तसेच शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बाबुराव केळूसकर म्हणाले, आरपीआय पक्षाची निवडणुकीत भाजपाशी युती असली, तरी या ठिकाणी एक सच्चा माणूस म्हणून आम्ही आमदार नाईक यांच्या पाठीशी ठामपणे राहिलो. आमच्या नगरातील समस्या, प्रश्न नाईक यांनी मार्गी लावावेत, असे आवाहन त्यांनी केले. राजन नाईक म्हणाले, येथील सर्व प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शिवसेना आमदार, खासदार नेहमी कार्यरत राहणार आहेत. तसेच येथील देवस्थान जमिनीचा प्रलंबित प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जाधव, आभार आनंद पेंडुरकर यांनी मानले. यावेळी आरपीआयचे भूषण कुडाळकर, विक्रम जाधव, अमर कुडाळकर, सागर कुडाळकर, संदेश मालवणकर, महेश तेंडोलकर, विकास कुडाळकर, विजय कुडाळकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारणारकुडाळ शहर आरपीआयच्यावतीने केलेला हा सत्कार कुडाळातील माझा पहिला सत्कार असून तो कधी विसरणार नाही, असे सांगून, ज्यांनी तयार केलेल्या घटनेवर भारत देशाचा कारभार चालत आहे, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा येत्या वर्षभरात खासदार राऊत यांच्या सहकार्याने उभारण्याचे आश्वासन यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिले.