शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश प्रभू यांचा होणार नागरी सत्कार

By admin | Updated: December 29, 2014 00:02 IST

कोकण रेल्वेच्या प्रश्नांवरही प्रभू यांच्या या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा ४ जानेवारी २०१५ रोजी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता रत्नागिरीकरांतर्फे नागरी सत्कार केला जाणार आहे. त्यासाठी आज (रविवार) येथील नगरवाचनालयात झालेल्या मान्यवरांच्या बैठकीत नगरवाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली ‘मंत्री सुरेश प्रभू नागरी सत्कार समिती’ स्थापन करण्यात आली आहे.प्रभू हे केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. नद्याजोड कार्यक्रमावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुरेश प्रभू यांना मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे.या पदावर येताच प्रभू यांनी कोकणवासियांच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या कोकण रेल्वेच्या समस्या सोडविण्यावर प्रामुख्याने लक्ष दिले आहे. कोकणवासियांचे कोकण रेल्वेबाबत अनेक प्रश्न, समस्या असून प्रभू रेल्वेमंत्री झाल्याने कोकणवासियांच्या समस्या सुटण्याबाबत आशा पल्लवीत झाल्या आहेत. मंत्री झाल्यानंतर प्रभू हे येत्या ४ जानेवारी २०१५ रोजी प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहेत. यादिवशी सावरकर नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता हा सत्काराचा कार्यक्रम होणार असून, त्यासाठी समितीने जय्यत तयारी सुरू केली आहे. कोकण रेल्वेच्या प्रश्नांवरही प्रभू यांच्या या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण, स्थानिक रेल्वेगाड्यांची संख्या वाढवणे आदी विषयांवरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.दरम्यान, सुरेश प्रभू हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. त्यातच प्रभू यांनी आता शिवसेनेतून भाजपात प्रवेश केल्याने स्थानिक शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्या या नागरी सोहळ्याला येणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)